तांबे डोणगाव येथे शनैश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

 

विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील तांबे डोणगाव येथील शनि मंदिरात शनिवार, ४ रोजी शनि अमावस्या निमित्त परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. याप्रसंगी भाविकांनी रांगेत उभे राहून मनोभावे दर्शन घेतले. शनि अमावस्या निमित्त भक्तांनी पुजारी कांताराव मुळे व गणेश मुळे यांच्या हस्ते विधीवत पुजा व अभिषेक केला.

तांबे डोणगाव येथे दर्शनासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील भक्तांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांच्यासाठी शनैश्वर मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसाद ठेवण्यात आला होता. यावेळी शनि भक्तानी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ घेतला.

यावेळी सरपंच सुनील राठोड, पंचायत समिती सदस्य सुनील तांबे, भाऊसाहेब तांबे, ग्रा.सदस्य प्रभाकर तांबे ,माजी सरपंच अमोल तांबे, बाबासाहेब भालेकर, कैलास गोर्डे, पिंटू तांबे, रामेश्वर तांबे, संतोष तांबे, योगेश तांबे, कडेठाणचे सरपंच संभाजी तवार, बालानगर सरपंच सोपान भालेकर, सोमनाथ भालेकर, राजु चव्हाण, रामेश्वर निळ, संभाजी हुड, रमेश काकडे, परसराम बनकर, कृष्णा भाऊसाहेब तांबे, काकासाहेब तांबे, धोंडीराम भालेकर, बाबासाहेब तांबे, भास्कर गोर्डे, प्राचार्य चव्हाण, कांताराव तांबे, दिलीप तांबे, लक्ष्मण तांबे, एकनाथ तांबे, परमेश्वर तांबे, ज्ञानेश्वर तांबे, सतिश तांबे, तुकाराम तांबे, सचिन तांबे, रेवन तांबे, चंद्रभान ढोले, धनंजय ढोले, सतिश ढोले, अजय तांबे, बद्रीनाथ तांबे, अफसर शेख, शिवाजी तांबे, विजय ज्योतिष्य, विष्णु ज्योतिष्य, सोपान तांबे, दिगंबर तांबे, कृष्णा तांबे, नवनाथ तांबे, राम तांबे, दादा तांबे आदींसह गावातील व परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या