मुस्लिम धर्मगुरूंना वकीलीची सनद

अहमदनगर/ जावेद शेख : धार्मिक कार्य करत असताना वेळ काढून समाजातील शोषित, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मुजाहीद खान मुअज्जम खान पठाण यांनी कायद्याचे ज्ञान घेत वकीलीची सनद प्राप्त केली.

राहुरी येथील ज्येष्ठ धर्मगुरू व समाजसुधारक स्वर्गीय मौलाना मुअज्जम खान पठाण यांचे चिरंजीव मुजाहीद खान मुअज्जम खान पठाण हे देखील हाफीज कुरान (धार्मिक गुरू) असुन वडीलांची प्रेरणा घेत सामाजिक व धार्मिक कार्य करताना गोरगरिबांवर होणा-या अत्याचार व अन्याय पाहता स्वतः वकील होवुन आजच्या घडीला मौलवी देखील मागे राहणार नाही हे दाखवुन देत कायदा पदवीधर पदवी प्राप्त केल्याने मित्र व समाजाचे वतीने सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे. राहुरी येथे सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी इम्रान नबी देशमुख, बिलाल शेख, डॉ.जाकिर शेख, इमदाद पठाण, सोहेल खान, मुज्जूभाई पठाण, मुजम्मिल शेख, नोमान वस्ताद, इम्रान सय्यद आदींनी अभिनंदन केले. अहमदनगर जिल्ह्यातील ते एकमेव हाफीज व वकील ठरले आहे. लवकरच ते जिल्हा व उच्च न्यायालयात गोरगरिबांसाठी लठा देतील, अशा सदिच्छा याप्रसंगी अनेकांनी दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या