एमआयडीसी परिसरात जुगार अड्डयावर छापा; ४९ जुगारी अटकेत


पैठण एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

विलास लाटे/पैठण : पैठण एमआयडीसी परिसरात पेपर मिल स्टाॅप परिसरात जवळपास मोठा जुगाराचा क्लब सुरू होता. बुधवार,१ रोजी क्लब वर पैठण पोलिस उपविभागीय अधिकारी व एमआयडीसी पैठण पोलिसांनी संयुक्त धाड टाकत तब्बल ४९ जुगारी सह ७ लाख ६४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परीसरातील अवैध धंद्यावाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती नुसार दि. १ बुधवार सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास पैठण औरंगाबाद मुख्य रस्त्यावरील पेपर मिल स्टाॅप जवळ धर्मराज पोपळघट यांच्या हाँटेल परिसरात फय्यूम रहेमान हा जुगाराचा अड्डा चालवित असल्याची माहिती गुप्त बातमी द्वारा मार्फत मिळताच पैठण पोलिस उपविभागीय अधिकारी विशाल नेहुल व सपोनि भागवत नागरगोजे यांच्या सह पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर जुगार अड्डयावर अचानक छापा टाकला. यामध्ये तब्बल ४९ जुगारी जागीच पकडले व त्यांच्यासह १० दुचाकी ज्याची किंमत ५ लाख ६५ हजार रुपये, एकून मोबाईल ३२ ज्याची किंमत १ लाख ८० हजार रूपये व रोख रक्कम १९ हजार ६१५ रूपये असा एकूण ७ लाख ६४ हजार ६१५ रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हि कारवाई पोलिस अधीक्षक निमित गोयल, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलिस उपनिरीक्षक दिलीप चौरे, राहूल भदरगे, पोलिस कर्मचारी राजेश चव्हाण, गणेश खंडागळे, गणपत भवर, सचिन भुमे,खंडु मंचरे, राहुल बचके, कृष्णा उगले आदींनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या