पत्रकार सुनिल भोसले यांचा वाढदिवसानिमित्त...

अहमदनगर/ जावेद शेख : अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे उपाध्यक्ष तसेच पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष सुनिल भोसले यांचा वाढदिवस आहे.

पत्रकार सुरक्षा समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत भोसले यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून राजाराम मोहन रॉय पुरस्कार, महाराष्ट्र रत्न पुरस्कार, राष्ट्रिय गौरव पुरस्कार (दिल्ली) असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. फार कमी वेळात मोठमोठ्या पदावर उंच भरारी घेणारे श्री भोसले यांच्या सारखे नशीबवान कमी असतात. पण त्या साठी कुशल कार्य, जाणीव तसेच समाजसेवा करण्याची जिद्द लागते.

आज श्री. भोसले यांचा वाढदिवस सर्वत्र हितचिंतकांतर्फे साजरा करण्यात येणार आहे. कारण दोन शब्द गोड बोलणे, सहकार्यांना वाटेल ती मदत, आपुलकी चा हात आणि भरभरून मानसन्मान! आहे सुनिल जी चा हा वाढदिवस पुन्हा! पुन्हा! युगा न युग येईल फुलांचा वर्षाव, सप्त सुरांचा नाद अशा मोठ्या जल्लोषात साजरा केला जाईल अशी सर्व मित्रपरिवार, आप्तेष्ट, कुटूबियांची सदिच्छा आहे. ती परमेश्वर पुर्ण करो अन् हा दिवस आनंदाचा घडो!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या