ह.भ.प.श्यामसुंदर महाराज सोन्नर (आळंदीकर) यांच्या हस्ते दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी पुणे येथे सन्मान सोहळा संपन्न...!
संगमनेर शहर : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि. ट्रस्ट) संस्थेच्या 21 व्या वर्षातील गुणिजन गौरव महापरिषद पुरस्कार निवड समितीच्या वतीने शिव प्रतिष्ठाण संघटनेचे संस्थापक शिवश्री राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार २०२१ ने सन्मानित करण्यात आले आहे. ह.भ.प.श्यामसुंदर महाराज सोन्नर (आळंदीकर ) यांच्या हस्ते दि. २४ डिसेंबर २०२१ रोजी पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात पुरस्काराने गौरविण्यात आले.
गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक रमेश आव्हाड हे होते. तसेच जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबनराव रसाळ, महापरिषद समन्वयक प्रकाश सावंत, शिवप्रतिष्ठाण चे रायगड जिल्हा संघटक डॉ. अशोक कुदनर, अहमदनगर जिल्हा संघटक अभय ढेंबरे, संगमनेर तालुका संघटक शिवनाथ नाईकवाडी, राजेंद्र बाजीराव ढेंबरे, सौ.प्रिया राहुल ढेंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवप्रतिष्ठाण संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम शिवश्री राहुल ढेंबरे पाटील करत आहेत. गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्यात यावे व गोहत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सह्यांची मोहीम, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी-कष्टकऱ्यांचे झालेले नुकसान, विजेसंदर्भातील नविन विज कनेक्शन, सौर कृषी पंप योजना, ट्रांसफार्मर संदर्भातील अडीअडचणी शासन दरबारी मांडण्याचे काम, छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती उत्सवानिमीत्त भव्य बालसंस्कार शिबिराचे आयोजन दरवर्षी केले जाते.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक/दळणवळण विषयक प्रश्नासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिबीराचे आयोजन, ग्रामीण भागातील पाणी, रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात, जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेण्याचे काम, कोविड महामारीतही रुग्ण व नातेवाईकांना मदतीचा हात देण्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने करत महाराष्ट्र राज्याचे विद्यमान आरोग्य राज्यमंत्री ना. राजेंद्रजी पाटील-यड्रावकर यांनी देखील शिवश्री राहुल ढेंबरे पाटील यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील हा युवातरुण सामाजिक शिवकार्य, शांत-संयमी, सामाजिक प्रश्नांची जाण असल्यामुळे थोरामोठ्यांच्या गळ्यातील ताईत बनला असुन तरूण पिढीसाठी एक आदर्श असाच आहे.
शिवश्री राहुल बाजीराव पा. ढेंबरे यांना राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार २०२१ ने गौरविण्यात आल्यानंतर विवीध क्षेत्रातील मान्यवरांनी समाजमाध्यमांतुन शुभेच्छा दिल्या आहेत.
0 टिप्पण्या