आदिवासी समाजातील सुनिल भोसले यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या अध्यक्षपदी निवड

अहमदनगर/ जावेद शेख : सेवक सेवाभावी संस्था जळगाव प्रणित महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समिति  च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी पुणे येथील पत्रकार सुनील ज्ञानदेव भोसले यांची नियुक्ति करण्यात आली आहे.

भोसले हे आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत आणि उत्कृष्ट पत्रकार म्हणून अवॉर्ड, महाराष्ट्र रत्न अवॉर्ड, राष्ट्रीय गौरव नवी दिल्ली येथे मिळाला आहे, असे अनेक पुरस्काराने सन्मानित आहे. बरेचशा राज्यामध्ये भोसले यांचा सन्मान झाला आहे. विशेष म्हणजे ते आदिवासी समाजातील आहे. त्यांची दि. १२ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रातुन अभिनंदन होत आहे. तसेच पुढील वाटचालीस अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. भोसले यांना सेवक सेवाभावी संस्थेचे संस्थापक विशाल अनंत शर्मा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या