आरडगांव/ राजेंद्र आढाव : आरडगांव येथे प्रसाद शुगर कारखान्याचे दोन ऊस तोडणी कामगार उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे जुगाडाचे चाक बदली करीत असताना अचानक टायर फुटुन दोन जण जबर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राहुरी तालुक्यातील आरडगांव येथे हॉटेल किनारा शेजारी प्रसाद शुगर कारखान्याचे तीन टोळ्या कार्यरत आहेत. त्यामध्ये बाहेर गांवावरुन टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत आलेले प्रसाद शुगर कारखान्याचे उस तोडणी कामगारांची टोळी मुक्कादम जिजाबराव चव्हाण निमदाळे व दयाराम रत्न सोनवणे मोरदारतोंड जिल्हा जळगाव हे दोघे ऊस तोडणी कामगार सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नादुरुस्त असलेल्या उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर जुगाडाचे चाक बदली करीत असताना अचानक टायर फुटल्याने हि घटना घडली.
त्यामध्ये या दोघांच्या पायाला जबर मार लागल्याने तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमींना नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या