मानोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी चोथे

आरडगांव/ राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील राजकिय दृष्ट्या महत्वाचा समजल्या जाणा-या मानोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शकुंतला पंढरीनाथ चोथे यांची निवड करण्यात आली आहे. लोकनियुक्त सरपंच आब्बासभाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हि निवड प्रक्रिया पार पडली आहे. ग्रामविकास अधिकारी मुरलीधर रगड यांनी सभेचे कामकाज पाहीले.

ग्रामपंचायतीच्या सभागृहात हि निवड प्रक्रिया पार पाडली. माजी उपसरपंच मनिषा रणजीत आढाव यांच्या राजीनाम्यानंतर हि निवड करण्यात आली आहे. सदर बैठकीसाठी सदस्य शामराव आढाव, प्रियंका जाधव, दिलावर पाठाण, हिराबाई ठुबे, कल्पना आढाव, शिवाजी थोरात, बापुसाहेब देवकाते, मनोज आढाव, आण्णासाहेब तोडमल, छाया पिले, शंकुतला आढाव आदिंनी ह्या निवड प्रक्रियेत सहभाग घेतला.

प्रसंगी बाळुकाका वाघ, ह.भ.प.भागवताचार्य किशोर महाराज जाधव, कचरू आढाव, निवृत्ती आढाव, भाऊराव वाघ, उत्तमराव आढाव, साहेबराव तोडमल, पोपट जाधव, उत्तमराव खुळे, शब्बीर पठाण, पंढरीनाथ चोथे, माधव पिले, भाऊसाहेब आढाव, डाॅ.राजेंद्र पोटे, भागवत आढाव, संजय पोटे, चंद्रभान आढाव, शाहराम आढाव, अनिल तनपुरे, नानासाहेब तनपुरे, डाॅ. बाबासाहेब आढाव, बाबा आढाव, साहेबराव तनपुरे, फक्कड शेेख, बापुसाहेब आढाव, रविंद्र आढाव, जितेंद्र तनपुरे, मधुकर भिंगारे, अंकुश जाधव, अर्जुन पोटे,आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी मुरलीधर रगड व आभार डॉ. बाबा आढाव यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या