श्रीरामपूर/बाबासाहेब चेडे : दिव्यांगांना प्रथमत: कूटूंबाकडून, नातेवाईक, आप्तस्वकिय यांनी सन्मानाची वागणूक देणे गरजेचे आहे. त्यानंतर समाजाकडून अपेक्षा करणे गरजेचे आहे. दिव्यांगासाठी सामाजिक उत्थानाकरिता अहोरात्र परिश्रम घेणारे अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे व त्यांना प्रत्येक सामाजिक कार्यात खांद्याला खांद्या देऊन खंबीर साथ देणार्या त्यांच्या सूविद्य पत्नी अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव अध्यापिका वर्षा गायकवाड (साळवे) या जोडीने स्वउत्पन्नातून दिव्यांगाकरिता सामाजिक भवन व दिव्यांग पूनर्वसन केंद्राची निर्मिती केली. स्वत:चे कूणीही दिव्यांग नसतांना दिव्यांगाचा सर्वांगीण विकास होण्याकरिता प्रकल्प उभा करणे म्हणजे दिव्यांगाकरिता दिपस्तंभाचे कार्य होय. अशाच समाजविभूतीच्या माध्यमातून दिव्यांगाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. श्रीरामपूर लायन क्लब संपूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील असे प्रतिपादन लायन क्लबचे माजी अध्यक्ष पूरूषोत्तम झंवर यांनी जागतिक दिव्यांग दिन दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळा व साउंड सिस्टिम संच वाटप कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी केले.
लायन क्लब श्रीरामपूर, अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर, आसान दिव्यांग संघटना महाराष्ट यांच्या संयूक्त विद्यमाने सहर्षा सभागृह, बोंबलेपाटील नगर यांठिकाणी दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळा व साउंड सिस्टिम संच साहित्य प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन क्लबचे अध्यक्ष सूनिल साठे होते. कार्यक्रमासाठी सौ.वर्षा झंवर, लायन क्लबचे उपाध्यक्ष राहूल आरबट्टी, सचिव प्रविण गूलाटी, खजिनदार हरिश पटेल, जयकिशन मिलाणी, अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड, आसान दिव्यांग संघटनेचे राज्याध्यक्ष मूश्ताकभाई तांबोळी, महिला राज्याध्यक्ष सौ.स्नेहा कूलकर्णी, खजिनदार सौ.साधना चूडिवाल, खोकर ग्रामपंचायतीचे सदस्य राजू चक्रनारायण यांची प्रमूख उपस्थिती होती. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त व स्व.नंदलालजी झंवर यांच्या प्रथम पूण्यस्मरणार्थ अपंग सामाजिक विकास संस्थेला साउंड सिस्टिम संच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तिंना मिष्टान्न वाटप करण्यात आले.
याप्रसंगी दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन केंद्राचे वैद्यकिय सामाजिक अधिकारी संजय साळवे यांनी दिव्यांग दिनाची निर्मिती इतिहास, दिव्यांग कायदा अधिनियम १९९५ व दिव्यांग कायदा अधिनियम २०१६ चे सविस्तर परिमार्जन केले. दिव्यांगाना २०१६ च्या कायद्यानूसार सर्वसमावेशक सूविधा शासन व स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत देण्याची व्यवस्था असतांना देखील त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी मात्र होतांना दिसत नाही. फक्त संशयास्पद मूकबधिर/कर्णबधिर दिव्यांगाची बेरा टेस्ट शिफारस करणे आवश्यक असतांना सर्वांनाच बेरा टेस्ट करण्यास सांगितले जाते. त्यामूळे मूकबधिर व त्यांच्या पालकांना मूंबईला नाहक चकरा मारून अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. अंध व मतिमंद प्रवर्गातील दिव्यांगाना पूणे येथे चकरा माराव्या लागतात. याबाबत जिल्हा परिषदेच्या ५% निधीमधून सदरची व्यवस्था जिल्हा रूग्णालय अहमदनगर येथे करणे गरजेचे आहे. याबाबत आसान दिव्यांग संघटनेमार्फेत शासनाकडे पाठपूरावा सूरू आहे. यांकरिता दिव्यांग शाळेतील पालकांनी व दिव्यांगानी जागरूकता दाखविणे अत्यंत गरजेचे आहे. याबरोबरच सर्व योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमासाठी आसान दिव्यांग संघटनेच्या दिव्यांग बांधवाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजन जिल्हाध्यक्ष विश्वास काळे यांनी केले तर आभार खोकर शाखेचे गंगाधर सोमवंशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीततेसाठी धनंजय हरदास, चांगदेव पूजारी, इंद्रभान पूजारी, कादरभाई शेख, दत्तात्रय चव्हाण, बाबासाहेब सलालकर, विजय भालेराव, कू.फरजाना पठाण, सौ.मीना भालेराव सचिन जाधव, गणेश बनसोडे इ.नी विशेष परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या