आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये मैदानी खेळास अनन्यसाधारण महत्त्व-निवृत्त पोलिस उपाधीक्षक कांचनकुमार चाटे

पैठण/ विलास लाटे : आजच्या धावपळीच्या जीवन शैलीमध्ये मैदानी खेळास अनन्यसाधारण महत्व आहे. मैदानी खेळाच्या माध्यमातुन मानवाची शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढीस लागुन मानसाचा सर्वांगीन विकास घडतो. ग्राऊंडवर खेळतांना प्रत्येक खेळाडूंचे आपापसातील संबंध हे बंधुत्वाचे निर्माण होत असल्या कारणाने खेळांच्या माध्यमातुन सामाजिक सलोखा निर्माण होतो, असे मत निवृत्त पोलिस अधिक्षक कांचनकुमार चाटे यांनी व्यक्त केले.

पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथे आयोजित खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार संजय वाघचौरे, निवृत्त पोलिस उपाधीक्षक तथा पैठण तालुका सक्रीय काँग्रेस नेते कांचनकुमार चाटे, प्रतिष्ठाण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविंद्र शिसोदे, माजी सरपंच दिपक शिसोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सपंन्न झाले. याप्रसंगी ते बोलत होते.

ढाकेफळ एलेवन क्रिकेट क्लब च्या वतिने आयोजीत स्पर्धेमध्ये प्रथम बक्षिस एक्केचाळीस हजार रुपये विशाल वाघचौरे यांच्या वतिने तर द्वितिय बक्षीस एकविस हजार रुपये कांचनकुमार चाटे यांच्या वतीने तर तृतीय बक्षीस अकरा हजार रुपये विकास शिसोदे यांच्या वतीने दिले जाणार असुन या व्यतिरीक्त इतर वैयक्तिक बक्षिसांची रेलचेल झाल्यामुळे दुरदुरुन मोठ्या संख्येने क्रिकेट खेळाडूंनी या ठिकाणी आपला सहभाग नोंदवीने चालु आहे.

एलेव्हन क्रिकेट क्लबच्या योगदान सहभागासाठी विशाल वाघचौरे, सुशिल शिसोदे, रीयाजोद्दीन सय्यद, किशोर शिरवत, सरफराज पठाण, रविंद्र बोबडे, इम्रान पठाण, कृष्णा उघडे, यशवंत शिसोदे, सुनिल शिसोदे, गणेश शिंदे, अलिम शेख, मनेश आव्हाड, मुन्ना शिसोदे, अमोनआव्हाड, रवि आढाव, अवेज पठाण, अमोल शिंदे, अनस पठाण, रोहीत शिंदे, रोहन शिसोदे, दादासाहेब खाटीक, सुधिर आव्हाड यांच्यासह मोठ्या संख्येने क्रीडा प्रेमी स्पर्धा यशस्वीतेसाठी परीश्रम घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या