लोणी : राहाता तालुक्यातील लोणी खुर्द ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या पोटनिवडणुकीत विद्यमान सरपंच जनार्दन घोगरे गटाच्या युवा परीवर्तन मंडळाच्या महाराष्ट्र शासनाच्या कृषीभुषण पुरस्काराने सन्मानित प्रभाताई घोगरे विजयी झाल्या आहे.
राहाता तालुक्यातील लोणी खुर्द ग्रांमपंचायतीची निवडणुक सहा महीन्यापुर्वी झाली होती. यात एकनाथ घोगरे गटाने बहुमत मिळवत सरपंच पदी जनार्दन घोगरे विराजमान झाले होते. मात्र जनार्दन घोगरे निवडणुकीत दोन जांगावर विजयी झाल्याने त्यांनी प्रभाग दोन मधील जागेचा राजीनामा दिला होता. या रीक्त जागेवर माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे यांच्या जनसेवा मंडळांचे उमेदवार किरण आहेर व घोगरे गटाच्या युवा परीवर्तन मंडळाच्या प्रभावती घोगरे यांच्या मध्ये अटीतटीची लढत झाली. यामध्ये बाजी मारीत घोगरे गटाच्या प्रभावती घोगरे यांनी विजय संपादन केला आहे. यात किरण आहेर यांना १२४८ मते मिळाली तर प्रभावती घोगरे यांनी १४२८ मते मिळवत १८० मतांनी विजय संपादन केला.
प्रभाताई घोगरे या विद्यमान सरपंच जनार्दन घोगरे यांच्या पत्नी असुन प्रवरा उद्योग समूहाचे संस्थापक व शिर्डी मतदार संघाचे पहिले आमदार स्व.चंद्रभान दादा घोगरे पाटील यांच्या स्नुषा व कोल्हार बुद्रूक येथील माजी जि.प अध्यक्ष स्व. शंकरनाना खर्डे पाटील यांच्या कन्या आहेत. लोणी खुर्द मध्ये प्रथमच ग्रामपंचायत स्थापनेपासून पती पत्नी दोघांनाही ग्रांमस्थानी ग्रांमपंचायतीमध्ये काम करण्याची ही पहिलीच संधी दिली आहे. जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी कटीबध्द असल्याचे सौ.प्रभाताई घोगरे यांनी विजयी सभेत सांगितले.
0 टिप्पण्या