किर्तनाने वरात संपन्न करुन नव्या पिढीला दिशा देणारा गिते परिवार - महाराष्ट्र शासन पुरस्कार देवदुत डाॅक्टर सन्मानित ह भ प डाॅ. जितेंद्र डोलारे महाराज

पाथर्डी प्रतिनिधी : समाजात संस्कार टिकवावे, तरूणांनी चांगला मार्ग स्विकारावा, चांगले संस्कार तरूणांना मिळावे यातुन व्यसन मुक्तीकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न गिते परिवाराने केला आहेे. तिन्ही भावांनी कोरोना काळात आरोग्य सेेेवा करून मोठी सेवा केली. वरातीत युवकांना व्यसनाकडे न वळवता किर्तनाने वरात संपन्न करुन नव्या पिढीला दिशा देण्याचे काम गिते परिवाराने केल्याचे प्रतिपादन पुणे येथील महाराष्ट्र शासन पुरस्कार देवदुत डाॅक्टर सन्मानित ह भ प डाॅ जितेंद्र डोलारे महाराज यांनी केले आहे.

तालुक्यातील डोंगरवाडी येथील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब गिते यांचे चिरंजीव डाॅ. तुकाराम व दैत्यनांदुर येथील शिक्षक दत्तात्रय दहिफळे यांची कन्या चि सौ का दिपाली यांचा शुभविवाह संपन्न झाला. वराती निमित्त गिते कुटुंबाने कर्तिनाचे नियोजन केले. त्यामुळे चिचोंडी पंचक्रोशीत एक नविन आर्दश निर्माण झाला आहे. बाबासाहेब गिते हे एक प्रगतशील शेतकरी असुन त्यांनी जिल्ह्यात इतिहास घडवला आहे. त्यांना एक मुलगी व तिन मुले आहेत. तिनही मुले डाॅक्टर आहेत. डाॅ. संतोष गिते एम डी मेडीसीन तर पत्नी वर्षा गिते एम बी बी एस, डाॅ. तुकाराम डेन्टीस्ट तर पत्नी डाॅ. दिपाली गिते बी ए एम एस, डाॅ. गणेश गिते एम बी बी एस आहेत.

एका शेतकर्यानी मोठ्या कष्टाने, जिद्दीने मुलांना घडवले आहे. अहमदनगर जिल्ह्यात परिस्थितीवर मात करून शिखर गाठणारे गिते कुटुंब पहीले कुटुंब आहे. समाजात संस्कार टिकवावे, तरूणांनी चांगला मार्ग स्विकारावा, चांगले संस्कार तरूणांना मिळावे यातुन व्यसन मुक्तीकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न गिते परिवाराने केला आहेे. तिन्ही भावांनी कोरोना काळात आरोग्य सेेेवा करून मोठी सेवा केली आहे. लवकरच गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी गिते कुटुंब अहमदनगर शहरात भिस्तबाग येथे सर्व सुविधा सोईयुक्त साई माऊली हाॅस्पिटल सुरू करत आहेत. गिते कुटुंबाचा आर्दश घेण्याजोगा आहे, असे ह भ प डाॅ जितेंद्र महाराज डोलारे महाराज यांनी गौरवोद्गार काढले.

यावेळी डोंगरवाडीचे सरपंच उद्धव गिते, दिलिप गिते,  उद्योजक भैरवनाथ गिते, कैलास गिते, रामनाथ शिरसाट, नवनाथ शिरसाट, रामचंद्र दखडखैर, विठ्ठल गिते,  अभियंता सुभाषराव दहिफळे, बाळासाहेब फुंदे, वैभव दहिफळे, अक्षय दहिफळे, रामदास वारे, डाॅ अमोल जाधवर, डाॅ सुजित मोटे, डॉ. मनोज जगदाळे, डॉ. गणेश मिसाळ, डाॅ. कराळे, डाॅ. कासार, जय हिंद फौडेशनचे शिवाजीराजे पालवे, शिवाजी गर्जे, गोरक्ष पालवे, अमोल जावळे, भिमराम दराडेे, हिराजी गितेे, आंबादास गितेे, संदिप दगडखैर आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या