महाराष्ट्र ग्रामसेवक युनियनची कार्यकारिणी जाहीर

फोटो : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या पैठण तालुकाध्यक्ष पदी खंडुभाऊ वीर, सचिव पदी अशोक आहेर यांची बिनविरोध निवड झाली यावेळी उपस्थित ग्रामसेवक

विलास लाटे/पैठण : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या पैठण तालुकाध्यक्ष पदी खंडुभाऊ वीर, सचिव पदी अशोक आहेर, उपाध्यक्ष श्रावण राठोड, महिला उपाध्यक्ष सौ.संगीता दानवे, महिला संघटक सौ.निर्मला कळसकर, कोषाध्यक्ष नारायण पाडळे, कार्याध्यक्ष दशरथ खराद, मानद अध्यक्ष भीमराव गाढे, कायदा सल्लागार वामन कळसकर, सहसचिव ईश्वर सोमवंशी, प्रसिद्धी प्रमुख रमेश जाधव यांची बिनविरोध निवड संघटनेचे जिल्हाध्यक्ष भिमराव पाटील दाणे, जिल्हा सरचिटणीस प्रविण नलावडे, जिल्हा सहसचिव सुहास पाटील यांनी केली. या नुतन कार्यकारिणीचे पैठण तालुक्यातील ग्रामसेवक, ग्रामसेविका यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या