अहमदनगर/ जावेद शेख : बदलापूर येथील प्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ व ऍक्युपंचरिस्ट डॉ. प्रवीण निचत यांच्या कार्याची दखल घेत जळगाव येथील सेवक सेवाभावी संस्थेच्या वतीने आचार्य आर्यभट्ट रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा येत्या २६ डिसेंबर २०२१ रोजी जळगाव येथे संपन्न हणार आहे. या सोहळ्यात डॉ. प्रवीण निचत यांना या वर्षीचा आचार्य आर्यभट्ट रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष सुनिल ज्ञानदेव भोसले हे आदिवासी व दुर्गम भागातील व्यक्ती असून समाजासाठी अहोरात्र झटणारी व्यक्ती म्हणूंन लौकिक असणाऱ्या व्यक्तीला जळगाव येथील सेवक सेवाभावी संस्थेच्या वतीने राजाराम मोहन राॅय रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
तसेच महाराष्ट्र महिला बचत गट सदस्य, समाज सेविका सौ सुरेखा तुकाराम भोसले ( पुणे ), ॲड. जया उभे ( पुणे ), शिक्षक आप्पासाहेब गणपती जाधव ( सांगली ), समाज सेविका कामाक्षी सोनी ( वाशीम ), अभिनेत्री गायिका सौ पुष्प चौधरी ( पुणे ) अश्या विविध ठिकाणच्या अद्भुत व्यक्तींना महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या