◾अनिता वानखेडे यांच्या तक्रारीची विभागीय आयुक्तांकडुन दखल
विलास लाटे/पैठण : लाच मागणीच्या कारणावरून लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडलेले पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या संपत्तीची ईडी मार्फत चौकशी करून त्यांच्या पैठण येथील कार्यकाळात झालेल्या सर्वच कामांची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँगेसच्या पदाधिकारी अनिताताई वानखडे यांनी विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्याकडे केली होती. याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून तहसीलदार शेळके यांच्या चौकशीचे पत्र काढण्यात आले आहे.
वानखडे यांनी दिलेल्या तक्रारीत तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केले असून औरंगाबाद गारखेडा भगतसिंग नगर परिसरात यांचा आलिशान बंगला आहे. तसेच पैठण येथील कार्यकाळात त्यांनी अवैध वाळू उपसा, मुरूम उपसा, माती उपसा, स्टोन क्रेशर आदी गौण खनिजाच्या बाबतीत मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्याच प्रमाणे तालुक्यातील एन ए नसलेल्या जमिनीला नाहरकत देऊन केलेला गैरप्रकार व वारस हक्का नुसार जमिनीची प्रकरण तडजोड अश्या विविध गोष्टीत तहसीलदार शेळके यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप अनिता वानखडे यांनी केला होता.
त्याच प्रमाणे तहसील कार्यालयात दरेगाव येथील शेतकरी यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीची चौकशी करावी अशी मागणी सुद्धा वानखडे यांनी केली होती. एकंदरीत वादग्रस्त तहसीलदार शेळके यांनी आपल्या पैठण येथील कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून त्याच्या संपत्तीची ईडी मार्फत चौकशी व केलेल्या कामांची चौकशी करावी अशी मागणी अनिता वानखडे यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे केली होती. यामागणीची विभागीय आयुक्त कार्यालयाकडून दखल घेण्यात आली असून नुकतेच चौकशीचे पत्र काढण्यात आले आहे.
0 टिप्पण्या