अहमदनगर/ जावेद शेख : महाराष्ट्र राज्यातील एकमेव शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शासनमान्य संघटना असणारी शिक्षक भारती संघटना शिक्षकांचे प्रश्न अविरतपणे सोडवण्यासाठी, शिक्षणाच्या हक्कासाठी व शिक्षकांच्या सन्मानासाठी लढणार्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ. कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष आर. बी. पाटील, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, जालिंदर सरोदे, विभागीय अध्यक्ष राजेंद्र लोंढे, राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारतीचे सरचिटणीस महेश पाडेकर, सल्लागार कैलास राहणे, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, उपजिल्हाध्यक्ष रामराव काळे, सचिन जासूद, अकोले माध्यमिक विभागाचे तालुकाध्यक्ष संजय पवार, बाळासाहेब भोत, पंडित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारती संघटनेचे तालुकाध्यक्षपदी संपत वाळके ( मॉडन जुनियर कॉलेज अकोले ) तर कार्याध्यक्षपदी गणपत धुमाळ (अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय समशेरपुर ) यांची निवड करण्यात आली आहे. तसेच शिक्षकेतर संघटनेचे नेते योगेश देशमुख यांची अहमदनगर जिल्हा समन्वयक पदी निवड करण्यात आली.
आगामी काळात शिक्षकांच्या प्रश्नांसाठी शिक्षक भारती संघटना प्रयत्नशील असून शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी या सर्व अधिकाऱ्यांसमवेत आमदार कपिल पाटील यांच्यासमवेत सहविचार सभा आयोजित करून प्रश्न सोडविण्याचे काम केले जाणार आहे. जेथे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अडचण येणार तेथे शिक्षक भारती त्यांच्या समवेत उभी असणार असल्याचे प्रतिपादन योगेश देशमुख यांनी केले.
याप्रसंगी पोपटराव उकिरडे, चंद्रकांत नवले, संजय गुगळे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, अमोल चंदनशिवे, रूपाली कुरुमकर, माफीज इनामदार, संदीप वर्पे, सचिन लगड, संजय तमनर, रूपाली बोरुडे, गोवर्धन रोडे, संजय भालेराव, दादासाहेब कदम, संतोष निमसे, श्याम जगताप, प्रवीण मते आदींनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या