विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील बिडकीन येथील सरस्वती भुवन प्राथमिक विभागात इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या चिमुकल्यांचे शालेय समिती अध्यक्ष नंदकुमार वैद्य, मुख्याध्यापक मधुकर बिरहारे, उपमुख्याध्यापक विश्वरूप निकुंभ, प्राथमिक विभागाचे मानद मुख्याध्यापक किशोर कुलकर्णी, पर्यवेक्षक राजेंद्र कोठावदे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
कोरोना या महाभयंकर महामारीच्या पार्श्वभूमीवर जवळजवळ दिड वर्षांनंतर या बालकांचे शाळेच्या परिसरात आगमन झाले. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा आनंद या बालकांच्या चेह-यावर ओसांडून वाहत होता. नवे मित्र, नवी शाळा, नवे पुस्तक, नवे शिक्षक हे सर्व पाहून ते भारावून गेलेले दिसले. एकदाची शाळा उघडली हे पाहून पालक वर्ग देखील आनंदीत झालेले दिसले. हा स्वागत सोहळा आनंदमयी करण्यासाठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अमृता काळे, अविनाश वाघचौरे, विलास चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या