राहुरी : शिक्षकनेते प्रा. भाऊसाहेब कचरे यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखालील,राज्यातील सहकारातील एक पथदर्शी असलेली माध्यमिक शिक्षक सोसायटी अहमदनगरच्या तज्ञ संचालकपदी ब्राम्हणी येथील आदर्श माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक उत्तम हनुमंत खुळे यांची निवड झाली आहे.
नगर येथे सोसायटीच्या संचालक मंडळ बैठकीत तज्ञ संचालक पदी श्री खुळे यांची निवड करण्यात आली. श्री.खुळे हे या संस्थेचे सलग 12 वर्ष संचालक तर एक वर्ष अध्यक्ष होते. त्यानंतर पुन्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे जेष्ठ संचालक व शिक्षक नेते प्रा. भाऊसाहेब कचरे यांनी श्री खुळे यांना तिसऱ्यांदा पुन्हा संधी दिली आहे. श्री खुळे व सहकारी संचालक यांच्या प्रयत्नातुन राहुरी शाखेसाठी 2011 साली स्वमालकीची इमारत झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व सभासदांची मोठी सोय झाली आहे.
उत्तमराव खुळे यांची निवड झाल्याने त्यांचे माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खा डॉ सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, जेष्ठ नेते ॲड. सुभाषराव पाटील, डॉ बा बा तनपुरे सहकारी कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे, व्हा चेअरमन दत्तात्रय ढूस, संचालक उत्तमराव आढाव, रविंद्र म्हसे, रावसाहेब चाचा तनपुरे, पुरोगामी सहकार मंडळाचे अध्यक्ष किशोर जाधव, विद्यमान संचालक संजय कोळसे, माजी चेअरमन अर्जुनराव डुकरे, माजी चेअरमन सतिशराव सप्रे, माजी संचालक व राहुरी माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सखाहरी खेडकर, माजी संचालक सोपानराव मगर, नंदकुमार दिघे, भाजपा शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष साहेबराव तोडमल, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सर्जेराव पेरणे, जालिंदर खडके, रायभान काळे, शिवाजीराव म्हसे, पोपटराव आढाव, प्रदीप तनपुरे, दादासाहेब चोथे, अशोक काळे, सुदाम दिघे आदीनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तालुक्यातील सोसायटीच्या सभासदांमधुन अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या