राहुरी शहर/अशोक मंडलिक : श्रीरामपूर येथील बिबट्याच्या हल्ल्यातील मयत झालेल्या राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील कै लक्ष्मण किनकर ह्याचे कुटुंबियांना आज माजी खासदार प्रसाद तनपुरे ह्यांचे हस्ते 5 लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला असून कै लक्ष्मण किनकर ह्यास वन विभागाच्या वतीने त्यांच्या कार्याबद्दलमरणोत्तर "वनश्री " पुरस्कार जिल्हा वनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने ह्यांनी जाहीर केला.
मागील 15 दिवसापूर्वी श्रीरामपूर येथे शहरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर येथील कर्मचाऱ्याने जे रेसिक्यू ऑपरेशन करून बिबट्यास जेरबंद केले होते, त्या ऑपरेशन मध्ये राहुरी येथील वन कर्मचारी कै लक्ष्मण किनकर हे जबर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. यातून सावरण्यासाठी कै किनकर ह्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबाबत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आज वन विभागाचे वतीने त्यांचे कुटुंबाला एकूण 15 लाख रुपयांची मदत देत असल्याचे जिल्हा वनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने ह्यांनी सांगितले असून 15 लाख रुपयांपैकी तातडीची मदत म्हणून आज 5 लाख रुपयाचा धनादेश माजी खासदार प्रसाद तनपुरे ह्यांचे हस्ते कै लक्ष्मण किनकर ह्यांच्या पत्नी विमल लक्ष्मण किनकर ह्यांना देण्यात आला असून उर्वरित 10 लाख रुपयापैकी 5 लाख रुपयेची मुदत ठेव पावती 5 वर्षांसाठी तर उर्वरित 5 लाख रुपयाची मुदत पावती 10 वर्षासाठी बँकेत ठेवण्यात येणार असल्याचे श्रीमती माने ह्यांनी सांगितले. तसेच कै किनकर ह्यांचे कुटुंबातील कायदेशीर वारसास अनुकंपा खाली कायम स्वरूपी नोकरी तर त्यांच्या पत्नी श्रीमती विमलबाई ह्यांना पेंशन देण्यात येणार आहे. कै लक्ष्मण किनकर ह्यांच्या ह्या कामगिरी बद्दल त्यांना वनविभागाचे वतीने "वनश्री "हा मरणोत्तर पुरस्कार घोषित करण्यात आल्याचे सांगितले.
यावेळी मारुती हारदे सरपंच नारायण झावरे, वसंत बिडवे, नायकवाडे गुरुजी, पप्पू माळवदे, नामदेव झावरे, निवृत्ती घनदाट, चंद्रकांत हारदे, रमेश हारदे, सर्जेराव हारदे, रामदास किनकर, प्रकाश किनकर, अमोल किनकर, अंजाबापू गागरे, बाबासाहेब किनकर, दिलीप हारदे, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या