खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्था सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या नुतन संचालकांचा सत्कार

खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्था सेवकांच्या सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

श्रीरामपूर / बाबासाहेब चेडे : खा. गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्था सेवक सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक प्रकिया निवडणूक निर्णय अधिकारी एस.पी.रूद्राक्ष, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीरामपूर यांचे अधिपत्याखाली नुकतीच बिनविरोध संपन्न झाली.

नवीन संचालक मंडळाचा सत्कार संस्थेचे सचिव अविनाश आदिक, सहसचिव ॲड.जयंत चौधरी, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य हंसराज आदिक, नितीन पवार, सुनील थोरात, माजी मुख्याध्यापक विश्वनाथ आवटी, प्रशांत खंडागळे या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

नवीन संचालक मंडळावर अशोक कटारे, बाळासाहेब बनकर, विलास कुलकर्णी, विजय थोरात, बाळासाहेब वमने, शामराव तऱ्हाळ, सुभाष काळे, संदिप बोरूडे, मुदस्सीर सय्यद, संजय शिंदे, विष्णुपंत राऊत, सुभाष पटारे, नवनाथ बर्डे, सौ.मंदाकिनी खाजेकर, सौ.संगीता घोडे यांची संस्थेच्या विविध विद्यालयांमधुन बिनविरोध निवड झाली.

पतसंस्थेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड ही अतिशय भुषणावह बाब असुन नवीन संचालक मंडळाने काटकसरीने कारभार करुन सभासदांच्या हिताचे निर्णय घ्यावे, असे आवाहन अविनाश आदिक यांनी केले. सहसचिव ॲड.जयंत चौधरी यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेऊन नवीन संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या. पतससंस्थेचे मॅनेजर संतोष दांडगे यांनी सुत्रसंचालन केले तर संचालकांच्या वतीनं विजय थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. विलास कुलकर्णी यांनी आभार मांनले.

या बिनविरोध निवडीबद्दल सर्व संचालक मंडळाचे संस्थेच्या चेअरमन पुष्पाताई आदिक, अध्यक्ष प्रा. डॉ. बबनराव आदिक, नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक व सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या