राहुरी शहर/अशोक मंडलिक : राहुरी खुर्द पोटनिवडणूक प्रचार नारळाचा शुभारंभ करण्यात आला. ज्या कुटुंबाने गावातील विकास कामांसाठी चाळीस वर्षे योगदान दिले त्याच कुटुंबांवर गावातील सत्ताधारी नेत्यांनी पोटनिवडणूक लादली ही गावच्या दृष्टीने दुदैवी बाब असल्याचे मत जेष्ठ नेते गेणूभाऊ तोडमल यांनी जनसेवा मंडळाच्या सौ अश्विनी सुनिल कुमावत यांच्या प्रचार नारळ शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले. ते कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते.
राहुरी खुर्द ग्रामपंचायतीच्या एक जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. जनसेवा मंडळ व बुवासाहेब ग्रामविकास मंडळ यांच्यात सरळ लढत होत आहे. सर्वसाधारण महिला राखीव जागा ही पुढे सरपंच पदासाठी दावेदार असल्याने व सुमारे चार वर्षांचा कालावधी शिल्लक असल्याने या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. पुढे बोलताना गेणूभाऊ तोडमल म्हणाले की गावातील काही स्वार्थी व राजकिय पुढाऱ्यांनी मतदारांना वेठिस धरून एक प्रकारे अन्यायच केला आहे. आता पर्यंत ज्या ठिकाणी व्यक्ती मयत होते ती जागा त्या कुटुंबातील व्यक्तींसाठी बिनविरोध केली जाते. परंतु स्वहित बघणाऱ्या नेत्यामुळेच ही पोटनिवडणूक होत आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी मा.सरपंच मधुकर साळवे, मा.मुळा प्रवरा संचालक आयुबभाई पठाण, पं स उपसभापती प्रदिप पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी गंगाधर शेडगे, पोपटराव चोपडे, नानाभाऊ तोडमल, पुंजा आघाव, लक्ष्मण चोपडे, रफिक शेख, दिलीप आघाव, पप्पू मालपाणी, एकनाथ माळी, युवराज तोडमल, आसफ पठाण, दिपक शेडगे, लहाणू माळी, बाळु वाघमारे, साहेबराव माळी आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांचे आभार ग्रा पं सदस्य राम तोडमल यांनी मानले.
0 टिप्पण्या