संगमनेर शहर : 'मयूरा लॉन्स' संगमनेर येथे तालुक्यातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची बैठक पार पडली. सरपंच ग्रामसंसद महासंघ, महाराष्ट्र राज्य' चे राज्य अध्यक्ष नामदेव घुले हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक व डोळासणे ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच बाळासाहेब काकड हे होते.
संगमनेर तालुका सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व सावरगाव तळ गणातील सर्व सरपंच यांच्या वतीने सावरगाव तळ गण प्रतिनिधी म्हणून सौ. अर्चनाताई शेळके यांचा कार्यकारिणीत निवडीचा प्रस्ताव कोंची गावचे सरपंच सोमनाथ जोंधळे यांनी मांडला. सर्वांनी एकमताने तो स्वीकारून त्यांची कार्यकारीणीत निवड केली. यावेळी संगमनेर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष घुले यांनी सरपंच ग्रामसंसद महासंघ, महाराष्ट्र राज्य' चे कार्य, उद्देश व पुढील वाटचाल स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू रहाणे यांनी केले.
या निवडीचे छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष कानवडे, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र डुबे, तालुकाध्यक्ष गणेश थोरात, तालुका उपाध्यक्ष सचिन गांजवे, युवक अध्यक्ष अनिकेत गोपाळे, अखिल भारतीय क्रांतिसेनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भोर, गणेश फरगडे, सतीश गोपाळे, शहागड प्रतिष्ठानचे निलेश डुबे आदींनी स्वागत केले.
0 टिप्पण्या