चोर समजुन धरलेली 'ती' महिला निघाली मनोरुग्ण, पोलिसांनी दिले नातेवाईकांच्या ताब्यात

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी : सुनसान रस्ता काळाकुट्ट अंधार ऊसाच्या शेतात एक महिला लपुन बसलेली माहिती स्थानिक शेतकऱ्यांना समजते. दहा बारा शेतकरी एकञ येवून राहुरी फॅक्टरी गणेगाव रस्त्याकडेला शेतात लपलेल्या लपलेल्या महिलेस पकडून पोलिस ठाण्यात माहिती दिली जाते. दहा कि.मी. रस्ता पार करुन सुमारे तीन तासा नंतर पोलिस आले. राञी बारा नंतर त्या महिलेस पोलिसांनी गस्तीवरील गाडीतून पोलिस ठाण्यात नेण्यात आले. परंतू सदर महिला चोर नसून मानसिक संतुलन बिघडल्याने वेड्याच्या भरात फिरत असते. ती महिला श्रीरामपूर तालुक्यातील मातापुर येथिल सोनाली मांजरे (वय 46) येथिल असुन तिला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुरी फॅक्टरी - गणेगाव या रस्त्याच्याकडेला गव्हाणे वस्ती जवळ ऊसाच्या शेतात एक महिला लपून बसली असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांना मिळते. काळ्याकुट्ट अंधारात त्या महिलेचा विजय गव्हाणे, मयुर कदम, निलेश त्रिभुवन यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांनी शोध घेतला. राञी 9 वाजता सदर महिला सापडली. तिच्याकडे चौकशी केली असता माझ्या बरोबरच्या तीघी कोठे गेल्या त्यांना शोधत आहे. तिला नाव गाव विचारले असता तिने प्रत्येकवेळी वेगवेगळी नावे सांगत असल्याने स्थानिक शेतकऱ्यांचा तिच्यावर संशय बळवला. विजय गव्हाणे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात चोरी करणारी महिला धरली असल्याची माहिती दिली. तब्बल तीन तासानंतर पोलिस राञी 12:30 वाजता गस्तीवरील गाडी घेवून आले. त्या महिलेस गाडीत बसवून राहुरी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. राञी तिची चौकशी केली असता मनोरुग्ण असल्याचे समजले. तिची अधिक चौकशी केली असता श्रीरामपूर तालुक्यातील मातापुर येथिल असल्याचे समजते. सोमवारी सकाळी तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.
पोलिसांची चुक स्थानिकावर बेतली असती 
       राहुरी फॅक्टरी गणेगाव भागात ऊसाच्या शेतात एक महिला लपली आहे. त्या महिलेचा शोध घेवून पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. परंतू पोलिस माञ तीन तासांनी आल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला. ती महिला खरोखर चोरांची साथीदार निघाली असती तर पोलिस उशिरा येण्याची चुक निगरानी करणाऱ्या त्या स्थानिक शेतकऱ्यांच्या जीवावर बेतली असती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या