दरम्यान इयत्ता पाचवीच्या अभिनव संदिप तिडके व इयत्ता आठवीच्या शंतनु माने, श्रीपाद देशपांडे, कार्तिक काव्हरे, विराज भोसले या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा मुख्याध्यापक मधुकर बिरहारे, उपमुख्याध्यापक विश्वरूप निकुंभ, पर्यवेक्षक राजेंद्र कोठावदे, माजी मुख्याध्यापक किशोर कुलकर्णी यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे शालेय समिती अध्यक्ष नंदकुमार वैद्य, मुख्याध्यापक मधुकर बिरहारे, उपमुख्याध्यापक विश्वरूप निकुंभ, पर्यवेक्षक राजेंद्र कोठावदे, ज्ञानेश्वर चाटुपळे, शालेय समिती सदस्य डॉ.मिलिंद कोनार्डे, किसनलाल तोतला, मच्छिंद्र पाटील हाडे, दामू आण्णा डुबे, डॉ.अत्माराम धरपळे, बबनराव ठाणगे, संजय दौडे आदींनी अभिनंदन केले आहे.या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख छाया डुबे, मनिषा सोनवणे, मंगेश कानोले, विलास कोळी, मनोज बोराडे यांचे मार्गदर्शन लाभले.
0 टिप्पण्या