!! निसर्गाचा लहरीपणा !!

ऋतू जरी असेल आता हिवाळा...!
त्यात मध्येच पावसाचा सोहळा...!!
पिकांवर जणू पांढऱ्या धुक्याची चादर...!
कुणी करतं का हो बळीराजाची कदर...!!
करपा व बुरशीचा पिकांवर हल्ला...!
मावा, तुडतुड्यांनीही मारला आहे डल्ला...!!
लाल कांद्याचा झाला आहे आता आंबा...!
किती दूर असेल हा अवकाळीचा थांबा...!!
पावसाने जणू त्याचं नशीबच फाटलं...!
डोळ्यातील अश्रुंचं पाणीच नाही आटलं...!!
हवामानाचाही अंदाज आहे आता पक्का...!
शेतकऱ्याला किती बसत असेल हा धक्का...!!
असंख्य दुःखाचे काटे आहेत त्याच्या वाटेवर...!
त्यासाठी किती भेगा पडतात त्याच्या टाचेवर...!!
अजूनही शोधत आहे तो विजयाची वाट...!
लवकरच व्हावी त्याच्या जीवनात सोनेरी पहाट...!! 

 _ बाळासाहेब भोर 
 अ. भा. क्रांतीसेना,संगमनेर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या