नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

राहुरी : नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी तालुका हद्दीत रस्त्याचे काम चालू असल्याने राज्य महामार्गावर आज दि. 24 डिसेंबर रोजी दुपार पासून मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती.

नगर मनमाड महामार्गावर लांबच्या लांब गाड्यांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे पोलीस प्रशासनाला मदत करण्यासाठी स्वराज्य पोलीस मित्र माहिती आधिकार व पत्रकार संघटनेचे पदाधिकार्यांनी पुढाकार घेतला.

यावेळी महाराष्ट्र संघटक सचिन दिघे, माहिती आधिकार व पत्रकार नाना जोशी, अहमदनगर जिल्हा सचिव डॉ. देवेंद्र शिंदे, अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख योगेश सुराणा, आष्टी तालुका सचिव संकेत जोशी, पोलीस मित्र बंडू गुरू यांनी अथक परिश्रम घेतले. रस्ता मोकळा करून दिल्याबद्दल राहुरी येथील ग्रामस्थ व प्रवाशांनी आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या