श्रीरामपूर / बाबासाहेब चेडे : तालुक्यातील ग्रामपंचायत हरिगाव येथे एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. ३ जागेपैकी दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या. एका जागेसाठी ए ब्लोक, महाजन वाडी प्रभाग ३ मध्ये एकूण मतदार ४४४ पैकी २४० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या जागेसाठी ५४ टक्के मतदान झाले असून शांततेत पार पडले होते.
तहसील कार्यालयात झालेल्या मतमोजणीत २४० पैकी ११९ मते मिळवून अपक्ष उमेदवार दिलीप त्रिभुवन हे विजयी झाले असून मुरकुटे ससाणे युतीचे उमेदवार दिपक नवगिरे हे पराभूत झाले असून त्यांना ११२ मते पडली व नोटाला ९ मते पडली. एक प्रकारे युतीला एक धक्का बसला. शेती महामंडळ मधील बरेचसे कामगार स्वेच्छा निवृत्तीमुळे हा प्रभाग सोडून शहराकडे व इतर गावाकडे गेल्याने मतदार संख्या घटली आहे. पोटनिवडणूक साठी दीपक नवगिरे व माजी सरपंच दिलीप त्रिभुवन यांच्यात सरळ लढत झाली होती.
0 टिप्पण्या