गाडीतुन खाली उतरण्याची तसदी न घेता पोलिस निरीक्षकांनी केली चोरीची पाहणी

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे : भल्या पहाटे बाजार तळावर नगर पालिकेचे सफाई कामगार झाडलोट करीत असताना दोन पलसरवर आलेल्या सहा चोरांनी सफाई कामगारां देखत देवळाली प्रवरा बाजारतळावरील पोष्ट आँफीसचे शटर तोडून प्रवेश केला. परंतू पोष्ट आँफीस मध्ये उचका पाचक करुनही चोरट्यांच्या हाथी काही लागले नाही. टाकळीमियाँ येथे किराणा दुकान फोडून तीन हजाराची रोकड लंपास करण्यात आली. चोरीची माहिती पोलिसांना दिल्या नंतर पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे फौजफाट्यासह दाखल झाले. परंतू गाडीतच बसुन चोरीची पाहणी केली. गाडीतुन खाली उतरण्याची तसदी पोलिस निरीक्षकांनी घेतली नाही.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळाली प्रवरा शहरातील शिवाजी चौका जवळील लक्ष्मीबाई साहेबराव सुर्यवंशी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटाची उचका पाचक केली. कपातील दोन हजाराची रोख रक्कम व नविन 10 साड्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. त्यानंतर चोरट्यांनी बाजारतळावरील पोष्ट आँफीसवर लक्ष केंद्रित केले. परंतू चोरट्यांनी पोष्ट आँफीसवर ग्राहक भंडार असा उल्लेख असल्याने चोरट्यांनी ग्राहक भंडार म्हणून पोष्ट आँफीस फोडले. पोष्ट आँफीस फोडीत असताना पहाटे 4:20 वाजता नगर पालिकेचे सफाई कामगार बाजारतळावर साफ सफाईचे काम करत होते. त्यांच्या समक्ष चोरट्यांनी पोष्ट आँफीस फोडले. आत मध्ये उचका पाचक करुन हाती काहीच लागले नाही. दोन पलसरवर बसुन सहा चोरटे सुसाट वेगाने निघुन गेले.

पोष्ट आँफीस फोडण्यापुर्वी श्रीरामपूर ते बाजारतळ रस्त्याने हे चोरटे आले. प्रथम ते बाबुराव पाटील मंदिरा जवळ थांबले तेथुन पोष्ट आँफीसवर लक्ष केंद्रीत केले. टाकळीमियाँ येथिल ओमकार पोपट घोडके यांचे बालाजी किराणा दुकान फोडण्यात आले. किराणा दुकानातून तीन हजार रुपये व महागड्या वस्तू चोरट्यांनी चोरुन नेल्या.

देवळाली प्रवरा बाजारतळावरील पोष्ट आँफीस चोरट्यांनी फोडल्या नंतर राहुरीचे पोलिस उप निरीक्षक एन.बी.सुर्यवंशी, पो.हे.काँ.प्रभाकर शिरसाठ, पो.काँ.शशिकांत वाघमारे, सागर माळी आदी चोरीच्या ठिकाणी हजर झाले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे हे आले असता सरकारी गाडीमध्ये बसुनच चोरीची पाहणी करुन पोलिस उप निरीक्षक सुर्यवंशी यांना सुचना करुन निघुन गेले. घटनास्थळी श्वान व ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. ठसेतज्ञ हे.काँ.रवि गायकवाड, पो.काँ.संतोष आरु यांनी ठसेची पाहणी केली असता कपाटावर तीन ते चार ठिकाणी ठसे आढळून आले. श्वान पथकाने रक्षा नामक श्वानास घटनास्थळी आणले असता रक्षा हिला चोरट्यांनी हातळलेली वस्तू देण्यासाठी उपलब्ध न झाल्याने रक्षास माग काढता आला नाही. श्वान पथकाबरोबर पो. हे. काँ. राजू वेताळ, पो.काँ उमेश गोसावी, वाहन चालक सचिन गोरे आदी होते. टाकळीमियाँ येथे हि श्वानास माग काढता आला नाही.
पोलिस निरीक्षकांची गाडीतुनच पाहणी...
       राहुरीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे चोरीच्या ठिकाणी आले. परंतू गाडीच्या खाली न उतरता चोरीची पाहणी केली. काही मिनिटातच सुचना करुन निघुन गेले. उपस्थित नागरीकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या