सभापतीपदाचा कार्यभार वंदना मुरकुटे यांनी स्वीकारला

श्रीरामपूर [बाबासाहेब चेडे] : श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापतीपदाचा न्यायालयीन लढाईनंतर निकाल जाहीर करण्याचे औरंगाबाद उच्च न्यायालयाचे आदेश आल्यावर डॉ वंदना मुरकुटे यांनी पदभार स्वीकारला. निवडणूक अधिकारी प्रांताधिकारी अनिल पवार यांनी प्रक्रिया पूर्ण केली. पंचायत समितीच्या आवारात दुपारी ३.४५ वा. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर श्रीरामपूर तालुक्याचे विद्यमान आ. लहू कानडे यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केल्यावर सभापतीपदाच्या आसनावर वंदना मुरकुटे विराजमान झाल्या. त्यावेळी कॉंग्रेसचे असंख्य कार्यकर्ते व त्यांचे सर्व पक्षाचे स्नेही नातेवाईक यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. १८ नोव्हेंबर रोजी माजी सभापती संगीता शिंदे यांना अपात्र ठरविल्यावर जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्या विरोधात पंचायत समिती सदस्य दीपक पटारे यांनी औरंगाबाद खंडपीठात पिटीशन दाखल करून निवडणूक कार्यक्रमावर आक्षेप घेतला होता. कार्यभार स्वीकारल्यावर श्रीरामपूर तालुका कॉंग्रेस अध्यक्ष अरुण पाटील नाईक, जेष्ठ नेते इंद्रनाथ पा.थोरात, विधिज्ञ समीन बागवान आदी सर्वांनी डॉ मुरकुटे यांचा सत्कार केला.

यावेळी अरुण पाटील नाईक म्हणाले की नेहमी सत्याचा विजय होतो हे यावरून दिसून येते. आ. लहू कानडे यांचे सतत मार्गदर्शन लाभलेले आहे. जी कामे ३ ते चार वर्षात झाली नाहीत ती आम्ही अल्प काळात पूर्ण करू. तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावू. पंचायत समिती अधिकारी यांनी समन्वयाची भूमिका ठेवल्यास कामे सुरळीत होतील. कोणत्याही दबावाला बळी पडू नये. त्यांचे कॉंग्रेस पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो. इंद्रनाथ थोरात यांनी सांगितले की सर्वांच्या सहकार्याने, सदिच्छेने डॉ मुरकुटे यांना सभापतिपद मिळाले व तालुक्यात जी खदखद होती ती आता बंद झाली आहे. आ. कानडे यांनी विकासाची घोडदौड सुरु केली. भारती संस्कृती प्रमाणे महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो पण तालुक्याचे मानसिक स्थैर्य बिघडलेले दिसते. मुंगेरीलाल यांचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही.

नूतन सभापती डॉ वंदना मुरकुटे यांनी प्रतिपादन करताना प्रथम महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व हा सत्याचा विजय त्यांना अर्पण करते. त्या पुढे म्हणाल्या माजी आ.स्व.जयंतराव ससाणे व बकाल साहेबांचेही मोलाचे सहकार्य लाभले. म्हणून हा दिवस दिसला. ना. बाळासाहेब थोरात, आ. सुधीरजी तांबे यांचेही सहकार्य लाभले. आजच्या लढाईमध्ये आ.लहू कानडे यांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याने ते आजच्या लढाईचे ते किंग मेकर आहेत. राष्ट्रवादीचे अविनाश आदिक यांची ऋणी आहे. मनोबल भक्कम ठेवण्याचा भावाने सल्ला दिला. सचिन गुजर यांनीही मला राजकारणात आणले. लढाई जिंकण्याचे शिल्पकार विधिज्ञ अजित काळे व सहकारी आहेत. आ. लहू कानडे यांचे मार्गदर्शन घेऊन पंचायत समिती पदाधिकारी तसेच विरोधकांना बरोबर घेऊन तालुक्याचे विकासकामाचे विविध प्रश्न मार्गी लावू. ज्यांनी मला विरोध केला त्यांच्यामुळे मला पुढे जाण्याची संधी मिळाली.

यावेळी आ. कानडे म्हणाले ही लढाई नीती विरुद्ध अनीती अशी होती. आज ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाने संविधान दिले लोकशाही आली. सर्वाना नैतिकतेचा कायद्याच्या चौकटीमध्ये संविधान मांडले. ज्याचे बहुमत असेल तो कारभार करील हा सोपा नियम. वंदनाताई यांनी महिलांचे प्रतिनिधित्व केले. आता जी संधी मिळाली त्यांचे सोने करावे. ना.बाळासाहेब थोरात, आ.सुधीर तांबे यानि या संघर्षात पक्षाला बळ दिले. पाठींबा दिला आमची उमेद कमी होऊ दिली नाही. आपल्याला जो अल्प काळ मिळेल त्याचे छान मनोगत व्यक्त केले. पद आले की जबाबदारी आली. आपण हा विकासाचा रथ पुढे वेगाने न्यावा, त्यासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत व ज्यांनी या कामात सहकार्य केले त्यांचे आभार मानतो. त्यांनतर सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ वंदना मुरकुटे यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या