शेवगाव/ प्रविण भिसे : जगाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याचे विटंबना करण्याचा प्रकार कर्नाटक मध्ये नुकताच घडला आहे. या प्रकारामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यामुळे विटंबना करणाऱ्या बांडगुळांवर गुन्हे दाखल करून त्यांना कडक शासन करावे अशी मागणी स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषिराज टकले यांनी केली आहे.
छत्रपती शिवराय हे सर्व जगासाठी प्रेरणादायी आहेत. शिवरायांचे अस्तित्व चंद्रसूर्य असेपर्यंत राहणार आहे. त्यांची विटंबना करणाऱ्यांची लायकी त्यांचे नाव सुद्धा घेण्याची नाही. परंतु त्यांचे पुतळे आणि स्मारक यांची सुरक्षा करण्याची जबाबदारी सरकारची असून सुद्धा राजकारणा पुरता शिवरायांचा नावाचा वापर करायचा आणि नंतर महापुरुषांचे पुतळे कडे दुर्लक्ष करायचे ही खरी समस्या निर्माण झाली आहे. अशा घटना थांबवायचे असतील तर प्रशासनाने पुतळे आणि स्मारकांना सुरक्षा द्यावी. शिवरायांचा अभ्यास नसणाऱ्यांनी शिवरायांवर बोलू सुद्धा नाही. त्यामुळे छत्रपति शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा स्वाभिमानी मराठा महासंघ जाहीर निषेध करत आहे.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दोषींवर कारवाई न झाल्यास स्वाभिमानी मराठा महासंघ राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा शिवशाहीर कल्याण काळे, स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ कृषिराज टकले, प्रदेशाध्यक्ष सुभाष गागरे, निरीक्षक अंकुश डांभे, मराठा भूषण चंद्रकांत महाराज लबडे, कार्याध्यक्ष रावसाहेब कावरे, युवक प्रदेश उपाध्यक्ष रुपेश दळवी, प्रवक्ते विक्रमादित्या मोरे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील, अहमदनगर युवक जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनिषाताई निमसे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष किशोर लोढे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल म्हस्के, शेवगाव तालुका अध्यक्ष अनिल सुपेकर, तालुका कार्याध्यक्ष शरद थोटे, युवक तालुका अध्यक्ष सतीश पवार, युवक तालुका कार्याध्यक्ष प्रवीण भिसे आदींनी दिला आहे.
0 टिप्पण्या