राहुरी शहर/अशोक मंडलिक : राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील जनता दरबारात मागील महिन्यात ना. प्राजक्त तनपुरेंनी रस्त्याच्या अतिक्रमण आणि रस्त्यालगतचे काटवन काढण्याबाबत दिलेले आश्वासन प्रत्यक्षात करून दाखविले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादी ओबीसी सेलचे मिलींद अनाप यांनी ना. तनपुरेंकडे पाठपुरावा केला होता. अनाप यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. याबाबत सात्रळ धानोरे, सोनगाव शिवरस्त्याचा श्वास मोकळा झाला आहे. या रस्त्यालगत पूर्णपणे काटवन तयार झाले होते. भरदिवसा याा रस्त्यावरून जाताना भिती वाटत होती. तसेच या परिसरात बिबट्याचे वास्तव्य तयार झाले होते. त्यामुळे शाळकरी मुलांमध्ये भितीचे वातावरण झाले होते. मात्र, आता या रस्त्याचा श्वास मोकळा झाल्याने परिसरातून ना. तनपुरे यांचे आभार व्यक्त होत आहेत.
यावेळी मिलींद अनाप, सूर्यभान शिंदे, नरेंद्र अनाप, मधुकर अनाप, राहुल अत्रे, विकास अनाप, कैलास अनाप, सीताराम अनाप, नामदेव अंत्रे, अण्णासाहेब अनाप आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या