अहमदनगर/ जावेद शेख : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी प्रा.दिलीप गायकवाड यांचा ९ डिसेंबर २०२१ रोजी साठ वर्ष पूर्ण झाल्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे भव्य सत्कार करण्यात आला. प्रा. गायकवाड यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करून निरोगी उदंड आयुुष्याकरिता मित्रपरिवाराकडुन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. महावीरसिंग चव्हाण तसेच त्यांचा स्टाफ आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा शमशुद्दीन इनामदार, बाळासाहेब डोंगरे, अरुण तुपविहिरे, एनसीसी अधिकारी संतोष जाधव आदींसह मित्रपरिवाराने भव्य सत्कार करत शुभेच्छा दिल्या आहेत.
0 टिप्पण्या