श्रीगोंदा/ सुभाष दरेकर : शिवसेना नेत्या दिपाली सय्यद तालुका दौर्यावर आल्याने तालुक्यातील शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात शिवसेना नेत्या सय्यद यांनी पदाधिकार्याबरोबर चर्चा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय सय्यद यांनी घेतला आहे. तसेच तालुक्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहुन आगामी विधानसभा लढण्याचे संकेत दिले. तालुक्यात नेहमीच भाजपच्या वाटेला विधानसभेचे तिकिट मिळते व सेनेवर अन्याय होत होता, अशी खंतही शिवसैनिकांनी व्यक्त केली
यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब दुतारे म्हणाले की, श्रीगोंदा तालुका हा साखर सम्राटांचा तालुका आहे. येथे काम करण्यासाठी खुप अडचणी येतात. तुम्ही वेळोवेळी तालुक्यात येऊन शिवसैनिकांना ताकत द्या. आम्ही आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा झेंडा फडकवण्याचा शब्द देतो व आगामी आमदार हा साखर सम्राट होणार नाही यासाठी शिवसैनिक प्रयत्न करीन व गरीब कुटुंबातील कार्यकर्ता नक्कीच तालुक्याचे प्रतिनिधीत्व करील, असे दुतारे यांनी सांगितले.
यावेळी तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे, संतोष खेतमाळीस, सुरेश देशमुख, निलेश साळुंखे, रोहन मोरे, नयन पानसरे, गायकवाड मॅडम, राजु तोरडे यांसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या