गुन्ह्यांच्या तपासकामी पोलिसांना मोकळा श्वास घेऊ द्या - सपोनि नागरगोजे

पैठण/ विलास लाटे : पोलिस अधिकारी, कर्मचारी नेहमी जनतेसाठी त्यांच्या असंख्य प्रश्न, अडचणी व समस्यांच्या निराकरणासाठी, गून्हेगारांचा बीमोड करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तत्पर असतात. मात्र अनेकदा पोलिसांना तपासकार्य बजावत असताना अनेक प्रश्न, अडचणी व समस्यांचा सामना करावा लागतो. कोणत्याही गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना काळवेळ न बघता जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावावे लागते. आणि असेच कर्तव्य पार पाडताना जर पोलिसांनाच कोणत्याही प्रकरणी सामान्य जनतेतून आजानतेपनाने त्रास होत असेल, तपासकामी घुसमट केली जात असेल तर पोलिसांना त्यांचे कर्तव्य बजावताना अनेकविध अडचणी निर्माण होतात. यासोबतच गुन्हेगारांची शक्तिही बळावते. असे प्रतिपादन पैठण औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी केले.

पैठण औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की पोलीस हे जनतेचे सेवक आहेत. त्यांच्याविषयी सामान्य जनतेने मनात भीती न बाळगता समाजिक सलोखा जोपासावा. तपासा दरम्यान जर एखाद्या आरोपीला नैसर्गिक आपत्ती, अपंगत्व किंवा मृत्यु ओढावल्यास पोलिसांना जबाबदार धरणे हे अत्यंत चुकीचे आहे. आणि जबाबदार धरल्यास पोलिसांविषयी समाजात चुकीचा संदेश जाईल. गुन्हा केलेले आरोपी नेहमी कायद्याच्या बंधनात न अडकता पळवाटा शोधत असतात. अशावेळी पोलिसांना निर्भयतेने व गोपनीय रितीने तपास करावा लागतो असेही ते म्हणाले.

यावेळी पोलीस उपनिरिक्षक दिलिप चौरे, पोलीस उपनिरीक्षक राहुल भादर्गे, राजेश चव्हाण, कर्तारसिंग सिंघल, राजू जिवडे, गोविंद राऊत, संपत दळवी, दिनेश दाभाडे, राहुल बचके, मंचरे आदी पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या