राहुरी फॅक्टरीच्या वैकुंठधामच्या शवदाहिनीवर चोरांनी मारला डल्ला

देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे : राहुरी तालुक्यात चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरी करणाऱ्या चोरांनांही चोरी कशाची करावी हे समजेना चोरांनी वैकुंठधाम मधील लोखंडी वजा बीड शवदाहिनी चोरुन नेली आहे. तीन महिण्यापुर्वीच लोकापर्ण झालेल्या वैकुंठधाम मधील साहित्य चोरीस गेल्याने पोलिसांसमोर तपासाचे आवाहन तयार झाले आहे. प्रत्येक मानवाचा शेवट हा वैकुंठधाममध्ये होत असतानाही चोरांनी शेवटचे ठिकाणावरही डल्ला मारल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

देवळाली प्रवरा नगरपालिकेने राहुरी फँक्टरी येथे वैकुंठधाम बांधण्यासाठी मोठा खटाटोप केला. वैकुंठधामची जागा जिल्हाधिकारी भोसले यांनी हस्तांतरीत करण्याचे आदेश दिल्याने नगर पालिकेस या ठिकाणी वैकुंठधाम बांधता आले. 11 आँक्टोबर रोजी या वैकुंठधामचे लोकापर्ण करण्यात आले. या वैकुंठधाम मध्ये दोन शवदाहिनी बसविण्यात आल्या आहेत. या पैकी एका शवदाहिनीवर आज पर्यंत अनेक अंत्यविधी झाले. दुसऱ्या शवदाहिनीवर अद्याप एक हि अंत्यविधी झालेला नव्हता. शुक्रवारी मध्यराञी चोरांनी वैकुंठधामकडे आपला मोर्चा वळविला तेथिल शवदाहिनीचे लोखंड वजा बीड खोलुन चोरुन नेण्याचा प्रकार घडला आहे. शनिवारी सकाळी हा प्रकार उघड झाल्या नंतर नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

नगरपालिकेने या वैकुंठधाम मध्ये  रस्ता दुरुस्ती, पुरुषांसाठी व महिलांसाठी स्वतंत्र बाथरूमची व्यवस्था, विजेचा प्रश्न, तार कंपाउंड, वृक्ष लागवड असे विविध कामे केलेली आहे. दोन दिवसापुर्वीच वैकुंठधामकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिवे बसवले आहेत. सर्व सोयीयुक्त वैकुंठधामचे लोकापर्ण करण्यात आल्याने राहुरी फँक्टरी येथिल नागरीकांनी समाधान व्यक्त केले होते. अवघ्या तीन महिण्यापुर्वीच लोकापर्ण झालेल्या वैकुंठधाम मधील शवदाहिनीचे लोखंड चोरीला जाणे म्हणजे चोरांनी हि शेवटच्या जागेवर सुद्धा डल्ला मारण्याचे सोडले नाही.

वैकुंठधाम मध्ये मानवजातीला काळीमा फासणारी घटना घडीली आहे.प्रत्येक मानव जातीचा ज्या वैकुंठधामत आयुष्याचा शेवट होतो. त्याच ठिकाणच्या  शवदाहिनीचे लोखंड चोरणाऱ्या विकृत प्रवृत्तीला चांगलाच धडा शिकवला पाहिजे असे संतप्त नागरिकांतून बोलले जात आहे.

शवदाहिनीची चोरी करणाऱ्या चोराची माहिती देणाऱ्यास रोख बक्षिस देवू - चव्हाण
          राहुरी फँक्टरी येथिल वैकुंठधाम मधील शवदाहिनीच्या लोखंडाची चोरी करणाऱ्या चोराची माहिती देणाऱ्यास एक हजार रुपयांचे बक्षीस  सामाजिक कार्यकर्ते किरण चव्हाण यांनी जाहीर केले आहे. त्यांनी पुढे असे आवाहन केले आहे की, जिल्ह्यातील भंगार विकत घेणाऱ्या दुकानदारांनी शवदाहिनीचे लोखंड वजा बीड विक्री करण्यास कोणी आले तर सदर खरेदी करताना त्याचे नाव व पुर्ण पत्ता घ्यावा जर आर्थिक मोबदल्यासाठी भंगार विकत घेणाऱ्या दुकानदारांनी सदर लोखंड विकत घेतले आणि ते सापडले तर कायदेशिर कारवाईला सामोरे जावे लागेल भंगार दुकानदारांनी मानवतेच्या दुष्टीने शवदाहिनीच्या चोरांची नावे समाजा समोर आणावी असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.

 

नागरीकांनी सार्वजनिक मालमत्तेवर लक्ष ठेवणे गरजेचे- निकत
          राहुरी फँक्टरी येथे विशेष प्रयत्नातुन वैकुंठधाम बांधण्यात आले आहे. हे वैकुंठधाम बांधताना पुढील तीस ते चाळीस वर्षाचा विचार डोळ्या समोर ठेवून बांधण्यात आले आहे. दोन स्वतंञ शवदाहिन्या बसविण्यात आल्या आहेत. त्यापैकी एका शवदाहिनीचे लोखंड वजा बीड चोरट्यांनी चोरुन नेले आहे. या वैकुंठधामचे ज्यावेळेस लोकापर्ण करण्यात आले तेव्हा पासुनच सार्वजनिक मालमत्ता झाली आहे. त्यामुळे नागरीकांनी सार्वजिनिक मालमत्तेची कोणी हानी करत असेल तर नागरीकांनी पोलिस किंवा नगर पालिकेस त्वरीत कळविणे गरजेचे आहे. जेणे करुन अशा लोकांविरोधात कायदेशिर कारवाई करता येवू शकते असे मुख्याधिकारी अजित निकत यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या