जागतिक दिव्यांग दिनानिमित्त निबंध स्पर्धा संपन्न


विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील बिडकीन येथील सरस्वती भुवन प्रशालेत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त निबंध स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. दरम्यान ३ डिसेंबर ते ९ डिसेंबर पर्यंत दिव्यांग सप्ताह म्हणून प्रशालेत साजरा करण्यात आला. समग्र शिक्षा अभियान तर्फे प्रशालेत ' दिव्यांगाची यशोगाथा' व  गोष्ट अरूनिमाची या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत इतर विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. या स्पर्धेत ऋतुजा रविंद्र लंभाडे हिने प्रथम क्रमांक पटकाविला व गायत्री गिर्जे हिने द्वितीय क्रमांक, तर मिना ठाकूर हिने तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिक्षिका एस.आर. कुलकर्णी, जगन्नाथ राऊत, पर्यवेक्षक राजेंद्र कोठावदे, विशेष शिक्षिका अनिता पिल्ले यांनी परिश्रम घेतले.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण मुख्याध्यापक मधुकर बिरहारे, उपमुख्याध्यापक विश्वरूप निकुंभ, पर्यवेक्षक राजेंद्र कोठावदे, विशेष शिक्षिका अनिता पिल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संतोष शिंदे यांनी मानले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या