वनराई व क्रॉम्प्टन कंपनीच्या माध्यमातुन पेमगिरीत जलसंधारणाच्या कामांचा श्रीगणेशा...!

संगमनेर/ बाळासाहेब भोर : तालुक्यातील पेमगिरीत आज गावच्या शेजारीच असलेल्या नाल्याच्या सांडव्याच्या पक्क्या पुनर्रबांधकामासाठीच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. याप्रसंगी वनराई व क्रॉम्प्टन कंपनीच्या प्रमुखांनी पूर्ण नाल्याची पाहणी करून योग्य तो निधी व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

हा मातीचा नाला पूर्वी श्रमदानातून करण्यात आला होता परंतु नाल्याचा सांडवा वारंवार वाहत्या पाण्यामुळे माती वाहून जाते परिणामी नाल्यात पाहिजे तसं पाणी साचत नाही. त्यामुळे सांडवा आता सिमेंट काँक्रेटमध्ये बांधण्याचा मानस आहे त्यामुळे या पक्क्या कामामुळे शेतकऱ्यांबरोबर सर्वांनाच फायदा होणार आहे.

तसेच गावातील अजूनही इतर जलसंधारणाची कामे करण्याचा या संस्था व कंपनीचा मानस आहे. जयहिंद लोकचळवळीच्या मार्गदर्शनानुसार वनराई संस्था व क्रॉम्प्टन कंपनीच्या फंडातुन सदरचे काम करण्यात येणार आहे.वनराई व क्रॉम्प्टन कंपनीच्या माध्यमातुन नेहमीच जलसंधारण, वृक्षसंवर्धन, कौशल्य विकास, व्यावसायिक या सर्वच क्षेत्रात भरीव काम चालु आहे.

या उदघाटन प्रसंगी जयहिंद लोकचळवळ प्रकल्प व्यवस्थापक अनंत शिंदे, वनराई संस्थेचे प्रकल्प अध्यक्ष जयवंतराव देशमुख, क्रॉम्प्टन कंपनी सी एस आर प्रमुख सौ.सीमा पावसकर तसेच दिलीप परब, सुनीता परब, पेमगिरीचे माजी सरपंच सोमनाथ गोडसे, उपसरपंच खंडू जेडगूले, विष्णु डुबे, ह.भ.प.हौशीराम महाराज कोल्हे, जनार्धन कोल्हे, जालिंदर शिंदे, राजूकाका डुबे, भाऊराव बोऱ्हाडे, विठ्ठल शेटे, समीर कोल्हे, संदीप डुबे, भीमा पांढरे, सतीश कोल्हे, विनायक कोल्हे, मनोज गोडसे, विनायक गोडसे, राजू परदेशी, योगेश शेटे, विठ्ठल डुबे, मच्छिंद्र डुबे, लहानू गोडसे, नामदेव गोडसे, रविंद्र परदेशी, संजय गिते, वृक्षमित्र स्वप्नील कोल्हे व पेमगिरीतील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या