आरडगांव/ राजेंद्र आढाव : राहुरी मांजरी रस्त्यावर मानोरी (ठुबे वस्ती) येथे समोरासमोर दोन मोटार सायकल धडकेत महिला व पुरुष जबर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राहुरी-मांजरी रस्त्यावर संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. मयुर आशोक कुंढरे वरखेड ता नेवासा हे मच्छिमार व्यवसाय करुन राहुरी येथून घराच्या दिशेने जात असताना मानोरी (ठुबे वस्ती) येथे मिरा बाचकर वाटापुर ता.नेवासा येथून आपल्या भावाच्या मुला सोबत जात असताना समोरासमोर मोटारसायकल धडकेत हि घटना घडली असल्याचे समजते.
आसपासच्या नागरिकांनी रुग्णवाहिकेचे ड्रायव्हर सचिन धसाळ यांना तातडीने फोन करून जखमींना नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या