राहुरी / बाळकृष्ण भोसले - राष्ट्रीय पातळीवरील पक्ष असलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी कोल्हार खुर्द येथे सदिच्छा भेट देत पक्षाच्या कामकाजाविषयी माहिती घेतली व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष असलेल्या धीरज शर्मा हे शिर्डी येथे साई बाबांच्या दर्शनासाठी आले असता त्यांनी जिल्हा सरचिटणीस राजेंद्र लोंढे व डॅा. संकेत जाधव पाटील यांच्या विनंतीवरून त्यांनी कोल्हार येथे येऊन पक्षाचे संपर्क कार्यालयाचे उदघाटन केले. कोल्हार खुर्द विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने तसेच इतर संस्थांनीही त्यांचा सत्कार केला. येथील डॉ.संकेत जाधव पाटील यांचेशी त्यांच्या असलेल्या मैत्रीमुळे त्यांनी कोल्हार खुर्द येथे थांबून पक्षाच्या पदाधिकारी यांचेकडून माहिती घेतली. पक्षाचे ध्येय धोरणे व शासनाच्या विविध योजना यांचा सर्वसामान्य लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून पक्ष बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रसंगी त्यांचा वाढदिवस कोल्हार ग्रामस्थांचे वतीने साजरा करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा सरचिटणीस राजेंद्र लोंढे, अर्जुन जाधव पाटील, अनिल शिरसाठ, मच्छिंद्र जाधव पाटील सुरज जाधव पाटील अविनाश लोंढे, दिग्विजय शिरसाठ, प्रकाश शिरसाठ, संदीप बनकर, सदानंद शिरसाठ, नितीन भोसले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या