देवळाली प्रवरात भूमिगत गटारीच्या विकास कामांचा आज शुभारंभ

भाजपाची दुटप्पी भुमिका: फ्लेक्सवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची नावे वगळली


देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे : देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या शहरात भुमिगत गटार टप्पा क्र. 1 भूमिपूजन समारंभ सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्याच्या निमंञण पञिकेवर शिवसेनेचे खा.सदाशिव लोखंडे व काँग्रेसचे आमदार लहुजी कानडे, डॉ. सुधीरजी तांबे, राष्ट्रावादीचे आ.अरुणकाका जगताप यांच्या प्रमुख उपस्थित होणार असल्याचे प्रसिद्ध केले असले तरी भाजपाने दुटप्पी भुमिका घेतली असुन निवडणूकीचे वारे वाहत असल्याने सावध पविञा घेत शहरात लावलेल्या फ्लेक्सवर शिवसेना खासदार, काँग्रेस व राष्ट्रवादी आमदार यांची नावे व फोटो टाळण्यात आली असल्याने हे नेते कार्यक्रमास उपस्थित राहणार का? असा प्रश्न काही जाणकार नेत्यांनी केला आहे. तर आ.राधाकृष्ण विखे हे गेल्या पाच वर्षात देवळाली प्रवरात ढुंकुणही पाहिले नाही. निवडणूकीचे वारे वाहण्यास सुरवात झाल्याने विखेनी कार्यक्रमास हजेरी लावण्यास येत असल्याची चर्चा होत आहे. नगरविकास राज्यमंञी ना.प्राजक्त तनपुरे तालुक्यातील रहिवाशी असतानाही त्यांनाही टाळण्यात आले आहे.

देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाने विविध विकास कामांचे भूमिपूजन व शुभारंभ करण्याचा धडाका लावला आहे. सोमवारी देवळाली प्रवरा शहरात भूमिगत गटार टप्पा क्रमांक १ प्रकल्पाचे भूमिपूजन सभारंभ सोहळा आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते राहुरी फॅक्टरी येथे करण्यात येणार आहे. आ. विखे गेल्या ५ वर्षात विधानसभा व लोकसभा निवडणुक वगळता देवळाली प्रवराच्या सत्ताधाऱ्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाल्याने आ.विखे यांनी देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणुकीत लक्ष घालण्यासाठी पुन्हा सत्ताधाऱ्यांकडे मर्जी वळविली आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीवेळी आ. विखे काँग्रेसमध्ये असल्याने त्यांनी भाजपच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार उभे करून त्यांना ताकद दिली होती. परंतु ऐनवेळी काँग्रेस - राष्ट्रवादी व भाजप यांची गुहा येथे झालेल्या गोपनीय बैठकी घेतल्या. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपला आतून मदत करण्याचे मतदानाच्या दोन दिवस आधी ठरले होते. त्याप्रमाणे भाजपला मदतही करण्यात आली होती. या मदतीमुळे काँग्रेस व राष्ट्रवादीचा ( राष्ट्रावादीचा एक वगळता ) सर्व उमेदवार पराभूत झाले होते. भाजपच्या विजयाचे खरे दावेदार आ.विखे असल्याचे देवळाली प्रवरात बोलले जात होते.

आ.विखे यांनी पुन्हा निवडणुकीच्या पडघमानंतर देवळाली प्रवरात लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. कदम पिता-पुत्र यांनी विखेंची जवळीक वाढवली आहे. यावेळी विखे गट भाजपला मदत करणार की वेगळी भूमिका घेणार हे येत्या निवडणुकीत पहावयास मिळणार आहे. आ.विखे गटाचे कार्यकर्ते आजही काँग्रेसमध्ये असले तरी ते मात्र विखे यांना मानतात. विखेंचा निर्णय सरआखोपे अशी भूमिका घेऊन काँग्रेसमध्ये राहुन ऐनवेळी विखे सांगतील त्याला मदत करतील असे बोलले जात आहे. परंतू विखेंच्या देवळाली प्रवरातील कार्यकर्त्यांचा भाजपा पेक्षा कदमांना जास्त विरोध असल्याने यावेळी विखे कार्यकर्त्यांची कशी समजुत घालणार याकडे देवळालीकरांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान देवळाली प्रवरा सह ३२ गावाने श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आ.लहू कानडे यांना मोठे मताधिक्य दिल्याने आ. कानडे यांचे देवळाली प्रवरात सातत्याने लक्ष राहत आहे. त्यांनी काँग्रेस वाढविण्यासाठी नुकताच देवळाली प्रवरात मेळावा घेतला. आगामी निवडणुकीची व्यहुरचना काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. आ.कानडे, शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे, राष्ट्रवादीचे आ.अरूणकाका जगताप, काँग्रेसचे आ. सुधीर तांबे यांना नगराध्यक्ष कदम भूमिगत गटार भूमिपूजनाचे आग्रहाचे आमंत्रण दिले आहे. आग्रहाचे निमंत्रण देऊन निमंत्रण पत्रिकेवर यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन कार्यक्रमाबाबतच्या पत्रिका शहरात वाटण्यात आल्या. मात्र भूमिपूजन सभारंभाचे फ्लेक्स शहरात लावण्यात आले. या फ्लेक्स बोर्डवर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षाचे खासदार व आमदार यांची नावे व फोटो टाळण्यात आली आहे. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना स्थानिक पदाधिकारी यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी आपल्या नेत्यांच्या कानावर या फ्लेक्स बोर्ड संदर्भात माहिती दिल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे शिवसेनेचे खासदार, राष्ट्रवादी व कोंग्रेसचे आमदार उपस्थित राहतील की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नगराध्यक्ष कदम यांचे मार्केटिंग...
   देवळाली प्रवरा नगरपालिका आगामी निवडणुकी संदर्भात नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांनी गेल्या ५ वर्षात केलेली विकास कामे फ्लेक्सद्वारे भाजपच्या विविध सेल सांगत आहे. यावरून नगराध्यक्ष कदम यांची आगामी निवडणुकीची मार्केटिंग चालू असल्याचे सर्व सामान्य जनता बोलत आहे. विशेष म्हणजे भाजपचे सत्ताधारी गटातील राहुरी फॅक्टरी येथील नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याने येत्या निवडणुकीत भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाल्याने नगराध्यक्ष कदम यांच्या मार्केटिंगचे फ्लेक्सबोर्ड राहुरी फॅक्टरी परिसरात लावून नगरसेवक राष्ट्रवादीत गेले तरी नगराध्यक्ष कदम यांनी राहुरी फॅक्टरी परिसरात विकासाची कामे कशी केली. याची जाहीरातबाजी भाजपाचे कार्यकर्ते करीत आहे.

शिवसेनेचा निधी चालतो, पण फ्लेक्सवर नाव चालत नाही; कराळे 
   शिवसेनेचे खा.सदाशिव लोखंडे यांनी पालिकेस मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. शिवसेनेच्या खासदार यांनी दिलेला निधी सत्ताधारी भाजप गटाला चालतो. भुमिगत गटारीचे भूमिपूजन कार्यक्रम पञिकेत खासदारांचे नाव छापण्यात आले. परंतू शहरात लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर माञ खासदार लोखंडे यांचे नाव टाकले नसल्याने हि भाजपाची दुटप्पी भुमिका आहे खा.लोखंडे हे या कार्यक्रमास उपस्थित राहु नये म्हणून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खा.लोखंडे यांच्या कानावर घातले आहे. असे शिवसेना शहर अध्यक्ष सुनिल कराळे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या