उद्या औरंगाबादला जुनी पेन्शन महामेळाव्याचे आयोजन


मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

विलास लाटे/पैठण : जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती आयोजित औरंगाबाद येथे गुरुवार,२ डिसेंबर रोजी भव्य पेन्शन महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. 

कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनप्रमाणे निवृत्ती वेतन व अन्य लाभ मिळावा यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन संघर्ष करावा लागणार आहे. यासाठी औरंगाबाद येथे उद्या गुरुवारी भव्य पेन्शन महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सर्वांनी सहभागी होवून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या