संगमनेर : तालुक्यातील पेमगिरी गावात आज आचानक कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरणने शेती पंपासाठी लागणारा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. सध्या शेतकऱ्याच्या उन्हाळी कांद्याच्या लागवडी सुरु असून महावितरणने कोणतीही पूर्वसुचना न देता विद्यूत पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
संगमनेरच्या अधिकाऱ्यांशी याबाबत क्रांतीसेनेचे बाळासाहेब भोर यांनी संपर्क साधला असता तुमच्याकडे खतं औषधं घ्यायला पैसे आहेत व वीजबिलं भरायला पैसे नाहीत अशी अभ्यासु उत्तरे मिळाली आहेत. एकूणच महावितरणाचा मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून अगोदर कोरोना संकट, महागाई, अवकाळी व त्यात महावितरणची हुकूमशाही शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे.
कोणतीही पूर्वसूचना न देता शेतीपंपाचा महावितरणने विद्युत पुरवठा खंडित करणे व थेट विद्युत रोहीत्र बंद करणे म्हणजे कायद्याची चौकट ओलांडल्यासारखंच असून यात खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा नाहक बळी घेतला जात आहे. महावितरणने याबाबद लवकरात लवकर तोडगा काढावा._ बाळासाहेब भोरयुवक तालुकाध्यक्ष,अ.भा.क्रांतीसेना,संगमनेर.
0 टिप्पण्या