माहिती अधिकार व पञकार संरक्षण समितीची बैठक संपन्न

अहमदनगर/ जावेद शेख : संगमनेर येथे माहिती अधिकार पत्रकार संरक्षण संघटनेची बैठक उतर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राहुल कुदनर व अहमदनगर जिल्हाध्यक्ष सचिन चांदघोडे यांच्या उपस्थितीत दि. ८ डिसेंबर २०२१ रोजी संपन्न झाली.

यावेळी या कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्र राज्य सरचिटणीस शंकरराव त्रिभुवन, उतर महाराष्ट्र संघटक चंद्रकलाताई रोकडे, अहमदनगरचे जिल्हा समन्वयक सौ कविता राक्षे यांनी केले. यावेळी उतर महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख भरत नजन, संस्थापक तथा राष्टीय अध्यक्ष दिपकजी कांबळेे, राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे, सचिव उतर महाराष्ट्र सद्दामभाई पटेल, राहुरी तालुका प्रसिध्दी प्रमुख दता जोगदंड, राहुरी तालुका समन्वयक नानाजी जोशी, उतर महाराष्ट्र राज्य संघटक तथा अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख सचिन दिघे, इतर विभागाचे पदाधिकारी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संतोष जावळे, अहमदनगर सचिव डॉ. देवेंद्र शिंदे, अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख योगेश सुराणा, जिल्हा पदाधिकारी उपस्थित हाेते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या