विलास लाटे/पैठण : औरंगाबाद पैठण रस्त्यावरून वाळूची अवैध चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना पैठण औद्योगिक वसाहत पोलिसांनी ढोरकीन जवळील लोहगाव फाट्यावर शुक्रवारी रात्री ११ वाजता पकडुन चालकास ताब्यात घेत १४ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी पैठण औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.२४ रोजी पैठण औद्योगिक वसाहत पोलिस रात्री परिसरात गस्त घालत असताना औरंगाबाद - पैठण मुख्य रस्त्यावरील बिडकीनकडून ढोरकीनकडे वाळूची अवैधरित्या चोरटी वाहतूक करतांना दोन ट्रॅक्टर लोहगाव फाटा येथे आढळून आले. पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतले असून २ ब्रास वाळूसह एकूण १४ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करीत वाहनचालक गोरख पवार (रा. नांदलगाव ता. पैठण) व किशोर अवचिंदे (रा. बिडकीन ता.पैठण) या दोघांविरुद्ध पैठण औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहायक पोलीस निरिक्षक भागवत नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक दिलिप चौरे, करतारसिंग सिंघल, राजेश चव्हाण, उगले यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
0 टिप्पण्या