अहमदनगर/ जावेद शेख : महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी राहुरी खुर्द येथील स्मारक मध्ये बाल्टी चे समता दुत एजाज पिरजादे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव अप्पासाहेब मकासरे, मधुकर साळवे, राहुरी खुर्दचे सरपंच अंबादास साखरे, उपसरपंच बाचकर, सदस्य शेडगे, भरत धोतरे, बिरूदेव ठोंबरे, बाळासाहेब दाभाडे आदि उपस्थित होते.
त्यानंतर गोटुंबा आखाडा येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष बाळासाहेब दाभाडे यांनी डॉ बाबासाहेब अंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य भरत धोतरे, शाळेचे मुख्याध्यापक मॅडम व शिक्षक वृंद उपस्थित होते.
तसेच राहुरी कारखाना येथे वंचित बहुजन युवाचे महासचिव अप्पासाहेब मकासरे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब अंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आरपीआय चे विलास साळवे, वंचित युवा शहराध्यक्ष महेश साळवे, राहुल चंदनशिवे, मधुकर साळवे, एजाज पिरजादे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या