माजी सैनिक शिवाजीराजे पालवे विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित

अहमदनगर : सशस्त्र सेना झेंडा दिवस ७ डिसेंबर च्या निमित्ताने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे माजी सैनिक शिवाजीराजे पालवे यांना विशेष गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले, निवासी जिल्हाधिकारी संदिप निचित, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजय वाकचौरे यांच्या हस्ते माजी सैनिक शिवाजीराजे पालवे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी संतोष मगर दिगंबर शेळके, मच्छिंद्र उबाळे, पोटघन आदी उपस्थित होते.

पालवे यांनी पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील कोल्हुबाई गडावर वृक्ष लागवड व संवर्धनाचे उल्लेखनीय कार्य केले आहे. गावातील सर्व दिवंगत व्यक्तींच्या नावे दोन रानटी फळझाडांचे रोपण करुन महाराष्ट्र राज्यातील पहिले डोंगरी स्मृती उद्यान तयार केले. 500 दिवंगत व्यक्तींच्या नावे 1000 फळझाडांचे रोपण केले. या मध्ये भोकर, आंबा, चिंच, पेरू, सिताफळ, जांभळ, चिकु, बोर अशी गावरान रानटी झाडे लावली आहेत.

या स्मृती उद्यानामुळे कोल्हुबाई गडावर पक्षांचे प्रमाण वाढेल, फळांचा लाभ पक्षी माणसे घेतील व आपल्या जीवलग दिवंगत व्यक्तीची आठवण राहील, अश्या प्रकारे प्रत्येक गावात स्मृतीवन तयार होणे गरजेचे आहे. माजी सैनिक शिवाजी पालवे यांनी जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन व जय हिंद वृक्ष बँक अहमदनगर च्या माध्यमातुन जिल्ह्यात विविध ठिकाणी हजारो झाडांचे रोपण करून वृक्ष संर्वधन करत आहेत. विशेषता राष्ट्रीय वृक्ष वड झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.

महाराष्ट्र जिल्हा सैनिक कल्याण विभागाच्या वतिने 10000-/ रु व सन्मान पत्र देऊन शिवाजीराजे पालवे यांचा गौरव करण्यात आला आहे. हि रक्कम डोेंगरी स्मृती उद्यान कोल्हार झाडांना पाणी देण्यासाठी खर्च केली जाईल, पुरस्काराने प्रेरणा मिळते व प्ररणेमुळे राष्ट्र मोठे होते, असे पुरस्कार प्राप्त शिवाजीराजे पालवे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या