श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : महांकाळ वाडगाव, सरला, गोवर्धन या तिन्ही गावांना वैजापूर तालुक्यातील चांदेगाव सबस्टेशनवरून लाईट पुरवठा होतो. सदर तीनही गांवे एकाच लाईट फिटर वरती जोडलेली असून फीडर ओव्हर लोड होत असल्याने तीनही गावांना दोन दिवसा आड शेती पंपासाठी लाईट पुरवठा होत होता. परंतु सदरील प्रश्न सोडविण्यासाठी लिंक लाईन व एक नवीन फीडर चे काम मंजूर झाले. यामुळे महांकाळ वाडगाव साठी स्वतंत्र फिडर व सरला गोवर्धन स्वतंत्र फिडर वरती जोडली जाणार असून तिन्ही गांवाचा शेती पंप लाईट समस्या पुर्ण पणे संपुष्टात येणार आहे. वरील लिंक लाईनचा प्रश्न माघील 10 वर्षांपासून प्रलंबित होता. सदरील लिंक लाईन आज कायदेशीर निधी मंजूर होऊन कायमचा मार्गी लागला.
या कामासाठी राज्य ऊर्जामंत्री प्राजक्त प्रसादराव तनपुरे, औरंगाबाद जिल्हा पालकमंत्री सुभाषराव देसाई, राष्ट्रवादी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अविनाश आदिक यांचे विशेष सहकार्य लाभले. औरंगाबाद महावितरण विभागाचे CE दरुले साहेब, वैजापूर महावितरण DY बडवे साहेब, चांदेगाव सबस्टेशनचे अभियंता कुलकर्णी, महांकाळ वाडगावचे वाघ त्याचबरोबर महांकाळ वाडगाव ग्रामस्थ यांनी मोलाची कामगिरी बजावली.
सदरील कामासाठी शासनाच्या कृषी आकस्मिता निधी {ACF} या योजनेतून एकूण 25 लक्ष रुपये मंजूर झाले. सदरील लिंक लाईन प्रश्नाचा महांकाळ वाडगाव येथील ग्रामपंचायत सरपंच राहुल नारायण चोरमळ, उपसरपंच नवनाथ वसंतराव पवार, ग्रामस्थ नंदु पा.चोरमळ, लक्ष्मण दातीर, डॉ.विश्वनाथ चोरमळ, नारायणराव बडाख, किशोर बडाख, पोपट बडाख, केशव बडाख, किशोर घोगरे, शषि वानखेडे, विठ्ठल सोमवंशी, वाल्मिक बडाख यांनी लिंक लाईन होण्यासाठी सतत पाठपुरावा केला व यश मिळवले.
0 टिप्पण्या