श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे : हरिगाव ता. श्रीरामपूर येथे १६ डिसेंबर १९३९ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत महार वतन परिषद झाली होती. आज त्याला ८२ वर्षे पूर्ण झाली आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या पावनभूमीत स्वाभिमान दिन साजरा केल्या जातो. भारतीय बौद्ध महासभा श्रीरामपूर व हरेगाव बुद्ध विहार ट्रस्ट यांनी शासकीय कोरोनाचे नियम पाळून धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण बुद्धविहाराचे अध्यक्ष प्रा.किरण खाजेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे समता सैनिक दलाचे ध्वजाचे ध्वजारोहण भारतीय बौद्ध महासभा अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. बुद्धविहारमध्ये बुद्धवंदना घेण्यात आली.
याप्रसंगी बुद्ध विहार सेक्रेटरी चंद्रकांत खरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हरिगाव बुद्धविहार व भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रा.किरण खाजेकर यांनी बुद्धविहाराचे नुतनीकरनाचे काम सूरु असल्याचे व धम्मदान देण्याचे आवाहन केले.
यावेळी झटपट धम्मभान या पुस्तकाचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केले. धम्मपरिषदेसाठी आलेल्या धम्मसेवकांची भोजन व्यवस्था हरिगाव येथील भीमसैनिक युवक यांनी केली. या स्वाभिमान दिन व धम्मपरिषदेस भारतीय बौद्ध महासभा व हरिगाव बुद्धविहार पदाधिकारी, धम्मसेवक उपस्थित होते.
0 टिप्पण्या