डाॅ.सौ.विद्याश्री मांडवकर यांना कलावंत विचार मंचातर्फे कवीयञी बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर

अहमदनगर/ जावेद शेख : कलावंत विचार मंच नाशिक व कमल फिल्म प्राॅडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षाचे कवीयञी बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय पुरस्कार मराठी, हिन्दी आदी सिनेसृष्टीतील पार्शव गायिका म्हणुन त्यांनी आभिनेते, गायक, संगितकार यांच्या सोबत गायलेली गाणे, तयार केलेली ऑडिओ / व्हिडीओ साॅॅंग व भारतात पहिली अशी महिला कि तिने संगीत या विषयावर पी.एच.डी करुन नाव मिळविले.

तसेच त्यांचा वौद्यकिय सेवेत मोठ योगदान आहे. रुग्णाची सेवा करणे, संगीताच्या साह्याने रुग्णांवर उपचार करणे, संगित हा विषय कसा महत्वाचा आहे ते समजुन सांगणे यांचा विचार करता नाशिक येथिल देण्यात येणारा राज्यातील सर्वात मोठा "कवीयञी बहिणाबाई चौधरी राज्यस्तरी पुरस्कार" कलावंत विचार मंच नाशिकने डाॅ.सौ.विद्याश्री मांडवकर यांना जाहिर करण्यात आला असे संस्थेचे अध्यक्ष सुनिल मोंढे यांनी एका प्रसिध्दी प्रञिकेेेद्वारे कळविण्यात आले. तसेच लोककवी वामन दादा कर्डक राष्ट्रीय पुरस्कार, शाहिर अमर शेख पुरस्कार आदी टप्या-टप्याने जाहिर करण्यात येेतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या