स्वाभिमानी मराठा महासंघाचा राज्यस्तरीय मराठा भूषण पुरस्कार ह भ प चंद्रकांत महाराज लबडे यांना जाहीर

अहमदनगर : छत्रपती शिवरायांचे जीवनकार्य जिवंत ठेवण्याचे काम शेवगाव येथील शिव अभिषेकच्या माध्यमातून प्रत्येक शुक्रवारी ह भ प चंद्रकांत महाराज लबडे करत आहेत. शिवरायांचा जन्म दिवस हा शुक्रवार होता. त्यामुळे शुक्रवारी अभिषेक घालून जन्म सोहळा  चंद्रकांत महाराज लबडे साजरा करत आहे. पुतळे स्मारक उभे करून होणार नाही. त्यासाठी त्यांची पवित्रता टिकून ठेवण्याचे काम सुद्धा करावा लागेल असे उद्गगार शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांनी काढले.

शेवगाव येथे 127 वा शिव अभिषेक सोहळा शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांच्या हस्ते नुकताच पार पडला. या शिव अभिषेक सोहळ्या निमित्त स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषीराज टकले म्हणाले की, छत्रपतींचे तत्व आणि गुण ह भ प चंद्रकांत महाराज लबडे यांनी अंगी कारून शिवकार्य पुढे नेण्याचे काम सुरू ठेवले आहे. राज्यामध्ये आदर्श असावा असा शिव अभिषेक शेवगाव येथे सुरू केलेला आहे. त्यामुळे राज्यस्तरीय मराठा भूषण पुरस्कार 2021 ह भ प चंद्रकांत महाराज लबडे यांना स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने दि. 31 डिसेंबर 2021 रोजी भातकुडगाव येथील अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात सायंकाळी सात वाजता, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर येथे शिवशाहीर कल्याण महाराज काळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात येणार आहे अशी घोषणा करण्यात आली.

या शिव अभिषेक सोहळ्यासाठी ह भ प चंद्रकांत महाराज लबडे, स्वाभिमानी मराठा महासंघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अंकुश डांभे, शेवगाव तालुका अध्यक्ष अनिल सुपेकर, प्रहार तालुकाध्यक्ष संदीप बामदळे, अक्षय डांगरे, युवराज म्हस्के, प्रवीण लबडे, नितेश गटकळ, निखिल पवार, रवींद्र गिरमकर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या